‘ही’ शेवटची इच्छा पूर्ण न होताच जग सोडून गेले राजीव कपूर, पहा ‘२८’ वर्षणांतर करणार होते….

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले. ते 58 वर्षांचे होते, त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या या नि’धनामुळे मात्र चांगलाच ध’क्का बसला आहे.
राजीव सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते, त्यांनी सकाळचा नाश्ता देखील केला होता. पण त्यानंतर मात्र त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृ’दय वि’काराचा झ’टका आला आणि त्यांनी अखेरचा श्वा’स घेतला. च्या अंत्यदर्शनासाठी कपूर कुटुंबियांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते.
मागील काही वर्ष कपूर कुटुंबियांसाठी चांगली गेली नाहीत. २०१८ साली राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचं नि’धन झालं होतं. २०२० सालच्या सुरुवातीलाच राज कपूर यांची मोठी मुलगी रितु नंदा यांचं निधन झालं. त्यानंतर एप्रिल महिन्यात लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचेही नि’धन झाले होते. आता राजीव कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबियांना मोठा ध’क्का बसला आहे. राजीव हे अत्यंत सरळ स्वभावाचे आणि निर्मळ मनाचे होते. पण त्याची शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
आपल्याला कदाचित माहित असेल कि राजीव कपूर यांनी एक जान है हम या चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. होती पण त्याचा हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला.
पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला होता. राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.
राजीव कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अ’फेअरची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. आणि त्यावेळी राज कपूर यांनी प्रेमरोग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे मुख्य भूमिकेत होते. त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजीव पद्मिनी यांच्या प्रेमात पडले होते. चित्रीकरणाच्या ब्रेकदरम्यान राजीव अनेकवेळा पद्मिनी यांच्या मेकअप रूममध्येच बसत असत.
ही बातमी त्याकाळात अनेक मासिकांमध्ये छापून आली होती. राज कपूर यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते प्रचंड चि’डले होते. पद्मिनी यांना त्यांनी सांगितले होते की, या चित्रपटात काम करायचे असेल तर त्यांना राजीव यांच्यापासून दूर राहावे लागेल अथवा त्यांना हा चित्रपट सोडावा लागेल. राज कपूर चिडल्यामुळेच राजीव आणि पद्मिनी यांच्या नात्याला तिथेच पूर्णविराम मिळाला.
आणि कदाचित तेव्हा पासून राजीव कपूर यांनी कोणताही चित्रपट केला नव्हता. पण राजीव कपूर तब्बल २८ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर परतणार होते. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात ते लीड रोल साकारताना दिसणार होते. आपणास सांगू इच्छितो कि १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.
यानंतर राजीव यांनी कुठल्याच चित्रपटात अभिनय केला नव्हता. पण अनेक वर्षांनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत परतण्याचे ठरवले होते. पण त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. राजीव कपूर यांनी एक जान है हम या चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्याची चित्रपट कारकीर्द इतकी यशस्वी राहिली नाही. पण त्याची चित्रपटसृष्टीत परत येण्याची शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.