ह्या अभिनेत्रीला घरचेच बोलत होते “काली कलुटी” पहा अखेर ह्याच अभिनेत्रीने कसे गाठले यशाचे शिखर…

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपलेच वर्चस्व प्रस्थापित करणारी देसी गर्ल प्रिंयांका चोप्राला कुठल्याही प्रकारचे पाठबळ नव्हते पण असे म्हणतात की हेतू साध्य करण्यासाठी आणि यशाचे शिखर गाठण्याकरिता येणारे अडथळे दूर करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे खूप अवघड आहे, सर्व अडथळे दूर करून मगच ते स्थान प्राप्त करता येते. अशी तग धरुन राहणारी जीवनशैली प्रियंका चोप्राची आहे, प्रियंका आज जी आहेत ती स्वत: च्या ताकदीवर उभी आहे.
पण तुम्हाला माहिती आहे काय की प्रियांकालाही रंगभेदाबद्दलचे आक्षेप ऐकावे लागले होते, लोकांनी तर ते ऐकवलेच आहे पण चक्क स्वतःच्या कुटुंबातील लोकही कमी नव्हते. होय, ऐकायला जरा अजीब च वाटेल पण हे सत्य आहेत की प्रियंका ला तिच्या घरचेच तिच्या रांगभेदावरून बोलत असायचे. ज्याचे स्पष्टीकरण प्रियंका ने स्वतः एका मुलाखतीत खेद व्यक्त केलेला आहेत.
२००० साली विश्व सुंदरी ही पदवी जिंकणारी प्रियांका चोप्राची तिच्या रंगाला उद्देशून तिचे कुटुंबीय चेष्टा करत असे, असे उघडकीस आणून देऊन प्रियंकाने सांगितले होते की तिचे सर्व चुलत भाऊ अथवा बहीण तिला काळी, काळी असे बोलून त्रास देत असत व चिडवत असत. प्रियांका चोप्राने तिच्या रंगाबद्दल सांगितले होते की, माझ्या घरात सर्व चुलतभाऊ गोरे होते पण फक्त माझा रंग गडद सावळा होता. प्रियंका चोप्रा म्हणाली की ती आपल्या वडिलांवर गेली होती. आणि माझे पंजाबी कुटुंब मला काळी काळी म्हणूनच आवाज द्यायचे. त्यावेळी प्रियंका चोप्रा अवघ्या 13 वर्षाची होती.
प्रियांकाला तिच्या स्वत: च्या कुटुंबीयांनी वारंवार त्या रंगाबद्दल चिडवल्यामुळे इतका कंटाळा आला होता की तिने त्वचेचा रंग बदलायचा निर्णय घेतला. तिने पुढे असेही म्हटले आहे की तिने फेअरनेसच्या उत्पादनास जवळपास 1 वर्षासाठी दुजोरा दिला परंतु नंतर तिला वाटू लागले की मी जशी आहे तशीच मी सुंदर आहे. तिने विचार केला की तिच्या खर्या रंगाचे सल मनावर घ्यायला नकोय. म्हणून तिने फेअरनेस क्रीम प्रोडक्ट च्या अॅड् करणे सुध्दा थांबवले, जरी तिला बर्याच ऑफर्स येत आहेत परंतु प्रत्येक वेळी ती त्यास नकार देते. परंतु ह्या सगळ्यात प्रियंका ची आई तिच्या सोबत होती व तीच प्रियांकाची उम्मेद वाढवत होती. ज्यामुळे प्रियंका आज इथपर्यंत आहेत. याचा खुलासा देखील प्रियंका ने मुलाखतीचे वेळी केला.
खरं तर, ती वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी बोस्टनला शिकण्यासाठी गेली होती. जेव्हा प्रियंका शिकून परदेशातून परत आली तेव्हा तिला तिची काकू “काली-कलुटी” असे बोलून त्रास देत असे. अशा प्रकारचे बोलणे ऐकून प्रियंकाचा आत्मविश्वासही गमावला होता. दुसरीकडे, वडिलांनी तिला ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी सुरू केली. मग तीच्या आईने असे पाऊल उचलले, ज्याने तीचे आयुष्य बदलले. ज्या विद्यापीठात तीला जायचे होते तिथे जाण्यासाठी पासपोर्ट ची आवश्यकता होती. आणि पासपोर्ट साठी प्रियंका ने जो फोटो काढून आणला होता तोच फोटो प्रियंका चे आईने “मिस इंडिया काँटेस्ट” साठी पाठविले. विशेष म्हणजे ही गोष्ट घरात कुणालाही माहीत नव्हती.
मग एक दिवस फोन आला की त्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रियंकाची निवड झाली आहे. सर्वांना हे कळले. खुशीची गोष्ट म्हणजे प्रियांकाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आणि त्याच वर्षी मिस वर्ल्ड 2000 चे विजेतेपदही जिंकले. यानंतर प्रियांकाने कधीही लोकांच्या आवडीची पर्वा केली नाही आणि तिच्या गतीच्या दिशेनेच चालत गेली.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रियांका चोप्रा 2015 पासून अमेरिकन चित्रपटात देखील सक्रिय आहे. प्रियंका चोप्राने हॉलिवूडमधील प्रवासादरम्यान अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासला डेट करण्यास सुरुवात केली, त्यानंतर या दोघांनी ऑगस्ट 2018 मध्ये यंगेजमेंट केली. नंतर 4 महिन्यांच्या अंतराने दोघांनी डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरमधील उम्मेद भवन येथे हिंदू आणि ख्रिश्चन रीतिरिवाजां प्रमाणे लग्न केले.