प्रियंका चोप्रापेक्षा कित्येक पटीने सुंदर आणि ‘हॉट’ दिसते तिची सासू, तिच्या समोर प्रियंकाही पडते फिकी..

प्रियंका चोप्रापेक्षा कित्येक पटीने सुंदर आणि ‘हॉट’ दिसते तिची सासू, तिच्या समोर प्रियंकाही पडते फिकी..

बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवणे आजकाल इतके सोपे राहिलेले नाही. असंख्य लोक रोज या क्षेत्रात आपले करियर बनवण्यासाठी येत असतात पण त्यांच्या हाती फक्त निराशाच येते. दरम्यान काहींचे बॉलिवूड मध्ये गॉडफादर असल्यामुळे त्यांना संधी मिळत असते. पण याला काही कलाकार अपवाद आहेत.

म्हणून आज आपण यातीलच अशा एका अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत जिने स्वतःच्या पायावर आणि हिमतीवर बॉलिवूड मध्येच नाही तर हॉलिवूड मध्ये देखील आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रियांका चोपडा आहे.

प्रियंकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एक यशस्वी अभिनेत्री, यशस्वी गायिका, यशस्वी निर्माती म्हणून प्रियंकाकडे पाहिले जाते. अभिनयक्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना प्रियंकाने या क्षेत्रात आपले प्रस्थ निर्माण केले. तिने 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

त्यानंतर तिने 2003 साली ‘द हिरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंदाज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तर प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले.

यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रियंकाने 2018 साली हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्न केले. सध्या ती त्याच्यासोबत न्यूयॉर्कमध्येच राहात आहे.

प्रियंकाच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. तिच्या फॅन्सची संख्या ही करोडोने आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, निकची आई म्हणजेच प्रियंकाची सासू तिच्यापेक्षा देखील कित्येक पटीने सुंदर आहे. तिला पाहिल्यानंतर तिला इतकी मोठी मुलं आहेत असे कोणीच म्हणणार नाही.

प्रियंका, निक यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला निकच्या आईचे अनेक फोटो पाहायला मिळतात. निकची आई प्रियंकापेक्षा देखील अधिक सुंदर असल्याच्या कमेंट नेहमीच सोशल मीडियाद्वारे नेटिझन्स देत असतात.

निक जोनसची आई डेनिस मिलर जोनसची तुलना प्रियंका चोप्रासोबत नेहमीच केली जाते. डेनिस मुळची टेक्सासची राहणारी आहे. डेनिसने १९८७ मध्ये निकचे वडील आणि गायक पॉल केविन जोनस सिनिअरसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्यावेळी ती केवळ १९ वर्षांची होती. इतकेच नाही तर ती २१ व्या वर्षांची असताना आई झाली होती. निक जोनसच्या जन्मावेळी त्याची आई २६ वर्षांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12