धर्मेंद्रचा “जावई” म्हणून ओळखला गेला असता अभिनेता “रणवीर सिंह”, पहा जर मध्ये आली नसती ही अडचण…

धर्मेंद्रचा “जावई” म्हणून ओळखला गेला असता अभिनेता “रणवीर सिंह”, पहा जर मध्ये आली नसती ही अडचण…

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग याला कोण नाही ओळखत. प्रत्येकाला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग माहीतच आहे कारण रणवीर सिंग कोणत्या ना कोणत्यातरी कारणामुळे मीडियामध्ये खूपच चर्चेत असतो. त्यांच्या विषयीच्याबऱ्याच किस्यांमुळे चर्चेला उधाण आलेले असते. मग त्या चर्चा चित्रपटांच्या असो किंवा जुन्या गर्लफ्रेंड विषयी. बऱ्याचदा त्यांच्या चर्चा आपली पत्नी दीपिका पादुकोण हिच्यामुळे देखील होत असतात.

त्यांनी दोन वर्षापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या सोबत लग्न केले आहे. रणवीर सिंग यांच्या अफेअर च्या देखील खूपच चर्चा होत असतात. वेगवेगळ्या आणि बऱ्याच अभिनेत्रींबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे. आजच्या या आमच्या लेखांमधून आम्ही तुम्हाला रणवीर सिंग यांच्या अशाच एका अफेयर बद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही चकित होऊन जाल. ज्या अभिनेत्री विषयी बोलणार आहोत त्या अभिनेत्रीचे नाव ऐकून तुम्ही हैराण झाल्या शिवाय राहणार नाहीत.

तुम्हाला हे माहिती नसेल की जेव्हा रणवीर सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते एका अभिनेत्री वर प्रेम करत होते. ही अभिनेत्री म्हणजे धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची कन्या अहाना देओल आहे. या दोघांची जवळीक इतकी वाढली होती की यांच्या नात्यांविषयी दोघांच्या घरच्यांना माहिती पडले होते. एवढेच नाही तर दोघेजण लग्न देखील करणार होते. दोघेही खुपच खुश होते आणि दोघांनाही मनापासून असे वाटत होते की आपले लग्न व्हावे.

तर दुसरीकडे आहना देओल चे वडील बॉलीवूडचे हीमॅन म्हणजे धर्मेंद्र यांना देखील दोघांची जोडी खूपच आवडत असे. त्यांनादेखील असे वाटत असे की दोघांचे लग्न व्हावे. परंतु काही कारणामुळे रणवीर सिंग आणि आहना देओल यांचे लग्न होऊ शकले नाही. काही काळानंतर त्यांचा ब्रेक-अप झाला होता. यामागे मिडियामध्ये बरेच कारणे सांगितली जात होते. परंतु काही मीडियाने यामागील खरे कारण असे सांगितले होते की रणवीर सिंग यांना मुंबई सोडून विदेशात आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी जायचे होते.

ज्यामुळे दोघांचे रिलेशनशिप संपुष्टात आले होते. त्यामुळे त्यानंतर रणवीर सिंग यांनी अहना देओल यांच्याशी ब्रेकप घेतला होता. त्यानंतर दोघे कधी एकमेकांना भेटले देखील नाही. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची कन्या अहाना देओल हिचा विवाह बिझनेस मॅन वैभव वोहरा यांच्याशी झाला आहे. वैभव आणि अहणा यांना एक मुलगा देखील आहे. या मुलाचे नाव दैरियन वोहना असे ठेवले गेले आहे. अहना आपल्या पतीवर खूपच प्रेम करते ती आपल्या पती पतीसोबत चर फोटो सोशल मीडिया वर शेअर करत असते.

पण हा सहसा चित्रपट करताना दिसत नाही ती आपला संपूर्ण वेळ आपल्या परिवारासोबत घालवत असते. अहना आपल्या पतीसोबत खूपच सुखी आयुष्य जगत आहे. अहना ने ‘ना तुम जानो ना हम’ या चित्रपटामध्ये काम केलेले आहे. रणवीर सिंग याचे खरे नाव रणवीर सिंग भवानी असे आहे. रणवीर सिंगने रोहित शेट्टी याचा चित्रपट सिंबा यामध्ये काम केले होते.

या चित्रपटात रणवीरने संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारली होती. त्यामुळे रणवीर सिंग खूपच लोकप्रिय देखील झाला. रणवीरने याशिवाय बेफिक्रे, बँड बाजा बारात, बाजीराव मस्तानी सारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात केलेले काम लोकांना खूपच आवडले. रणवीर सिंग काही दिवसांनी 83, जयेशभाई जोरदार आणि सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12