शाहरुखच्या “छैय्या छैय्या” गाण्यासाठी मलायकाला नाही, तर या मराठी अभिनेत्रीला दिली होती पहिली ऑफर, पहा या गुणामुळे दिलेली ऑफर…

कोरिओग्राफर फराह खानने प्रथम शाहरुखच्या चल छय्या छय्या या प्रसिद्ध गाण्या बद्धल आणि मलायकाच्या दिल से बद्दल बरीच चर्चा केली. बॉलिवूडची प्रख्यात नृत्य दिग्दर्शक आणि दिग्दर्शक फराह हीच्यापेक्षा चांगली कोरिओग्राफर शोधून सापडणार नाही. नुकतीच ती गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील झाली होती. येथे फराहने आपल्या मनातील काही गोष्टी उघडपणे बोलल्या आहे.
फराहने आपल्या दिल्ली येथील वर्कफ्रंट च्या प्रवासाविषयीही सांगितले आहे. फराहने येथे प्रथमच शाहरुखचे प्रसिद्ध गाणे छय्या छय्या आणि मलायकाच्या दिल सेबद्दल चर्चा केली. गाण्याचे शूटिंग करताना चित्रपटाच्या टीमला किती आणि कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला हे फराहने सांगितले. फराहने सांगितले आहे की आम्हाला रेल्वे स्टेशनवर शूटिंग करण्यास परवानगी मिळतं नव्हती.
या कारणास्तव, आम्ही ते ट्रेनच्या वर शूट केले. खास गोष्ट म्हणजे चार दिवसांच्या शूटिंगदरम्यान एकालाही रेल्वे च्या टॉप वरून खाली आणले गेले नव्हते. या गाण्यासाठी रवीना आणि शिल्पा यांना सर्वात अगोदर संपर्क साधल्याचे तीने पुढे सांगितले आहे. म्हणाली की शिल्पापासून रवीनापर्यंत अनेक अभिनेत्रींकडे आम्ही गाण्यासाठी संपर्क साधला.
पण कोणीही हे गाणे करायला तयार नव्हते. यानंतर मलायकाला हे गाणे देण्यात आले. मलायकाने हे गाणे सादर केले आणि ती एक स्टार बनली. दिल से’ या सिनेमात शाहरुख खान, मनिषा कोईराला या दोघांची मुख्य भूमिका होती. परंतु असे असून देखील शाहरुख आणि मनिषा कोईराला यांचेवर फिदा होण्याऐवजी मलायका अरोरावरच सर्वजण फिदा झाले होते.
तिच्या दिलखेचक अदा व कमरेवरील लटके झटके यांनी कितीतरी प्रेक्षकांच्या मनावर स्थान प्राप्त केलेली छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा आजही नेहमीच चर्चेत असते. या गाण्याने अशी काही जादू केली होती की सर्वजण मलायका अरोराच्या प्रेमातच पडले होते. एका ट्रेनच्या वरच्या छतावर या गाण्याची शुटिंग घेण्यात आली होती. चालत्या ट्रेनवर मलायका अरोरा आणि शाहरुखच्या डान्सने लोक देखील खूपच फिदा झाले होते.
आजही मलायका नाव घेताच हे गाणे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते. या गाण्यासाठी सुरुवातीला मलायका अरोरा हीला अगोदर पसंती दिली नव्हती तर शिल्पा शिरोडकरला या गाण्यासाठी पहिली ऑफर देण्यात आली होती. मलायकाच्या जागी शिल्पा या गाण्यावर डान्स करणार होती पण शिल्पाच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधी निघून गेली होती. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच शिल्पाला वाढत्या वजनाचा खूप मोठा फटका बसला होता.
शिल्पाला वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे कोणत्याही स्थितीत शक्य होनार नव्हते. शिल्पा शिरोडकर आज 51 वर्षांची झाली आहे. 20 नोव्हेंबर 1969 रोजी शिल्पाचा मुंबईत झाला होता. ती मराठी कुटुंबात जन्माला आली होती. वयाच्या 20 व्या वर्षी शिल्पाने तिच्या करियरला सुरुवात केली होती. तसेही तिला तिच्या अभिनयाचे धडे तिच्या आईकडून मिळालेली आहेत.
तिची आजी मीनाक्षी देखील मराठी सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री होती. गोविंदा, सुनील शेट्टी, अमिताभ, मिथुन आणि अक्षय कुमार या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करणारी शिल्पा आता सिनेमांपासून खूप दूर गेली आहे आणि काळानुसार तिच्या लूकमध्ये देखील खूप मोठा बदल झाला आहे. शिल्पा 2010 मध्ये आलेल्या ‘बारुद’ या चित्रपटात शेवटची झळकली होती.
ब-याच काळापासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे. आता लग्नानंतर ती संसारात पूर्णपणे व्यस्त झाली आहे. 11 जुलै 2000 रोजी शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले आज. सन 2003 मध्ये शिल्पाने अनुष्का नावाच्या मुलीला जन्म दिला आहे. 2000 साली लग्न झाल्यावर ती लंडनमध्ये शिफ्ट झाली पण आता परत शिल्पा मुंबईत परतली आहे. टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये देखील शिल्पाने काम करून प्रसिद्धी मिळवली आहे.
इतकेच नाही तर फराहने आपल्या ओम शांती ओम चित्रपटाच्या दीवानगी दीवानगी या गाण्याबद्दलही सांगितले. या गाण्यात बरेच स्टार्स दिसले होते. पण काही स्टार्स गाण्यासाठी तयार नव्हते. मला अमिरला गाण्यात घेण्याची इच्छा होती, जेणेकरून तिन्ही खान एका दृश्यात येतील अशी माझी इच्छा होती. आमिरने दहा दिवस मला त्रास दिला होता, कारण त्यावेळी तो ‘तारे जमीन पे’ चित्रपटाचे संपादन करीत होता.