‘या’ अभिनेत्रीने गोविंदासोबत केला होता ‘साखरपुडा’, पण गोविंदला सोडून गुपचूप ‘या’ अभिनेत्यासोबत उरकून घेतले ‘लग्न’…

‘या’ अभिनेत्रीने गोविंदासोबत केला होता ‘साखरपुडा’, पण गोविंदला सोडून गुपचूप ‘या’ अभिनेत्यासोबत उरकून घेतले ‘लग्न’…

बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा. आपला डान्स, कॉमेडी टायमिंग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनय याने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. गोविंदाचा आज म्हणजेच २१ डिसेंबरला वाढदिवस आहे. विरारचा छोरा अशी ओळख असणाऱ्या गोविंदाचे आयुष्य मुंबापुरीतच गेलंय.

इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचे रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने साऱ्यांची मनं जिंकली. त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला.

पण तुम्हाला माहीत आहे का कि या रो’मँटिक हिरोचे अनेक अभिनेत्रीसोबत नाव जोडले होते. पण एका अभिनेत्रीने तर चक्क साखरपुडा सुद्धा केला होता पण तिने लग्न कोणा दुसऱ्या सोबतच केले, होय हे खरं आहे. चला तर मग जाणून घेऊया ती अभिनेत्री कोण आहे.

आपणास माहित असेल कि नीलम कोठारीने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचे खुदगर्ज, हत्या, आग ही आग, खतरों के खिलाडी यांसारखे अनेक चित्रपट गाजले होते. त्या काळात नीलम प्रेक्षकांची प्रचंड लाडकी अभिनेत्री होती. गोविंदा, चंकी पांडे यांच्यासोबत तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदासोबतची तिची जोडी तर चांगलीच गाजली होती.

पण तुम्हाला माहीत आहे का कि गोविंदा प्रे’मात नीलम पार वेडी झाली होती. गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अ’फे’अरनंतर लग्न केले होते. पण लग्न व्हायच्या काही वर्षं आधी गोविंदा आणि नीलम एकमेकांच्या प्रे’मात प’डले होते. नीलमला पाहाताच क्षणी त्याला सुद्धा ती प्रचंड आवडली होती.

स्टारडस्टरला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या गोष्टीची कबुली देखील दिली होती. नीलमचे शिक्षण बाहेरगावी झाल्यानंतर ती करियरसाठी मुंबईत आली होती. गोविंदा आणि तिची भेट कुठे झाली होती हे देखील त्याच्या लक्षात आहे. त्याने त्या मुलाखतीत सांगितले होते की, मी प्रणल मेहताच्या ऑफिसमध्ये नीलमला सगळ्याच पहिल्यांदा पाहिले होते.

दोघांनी सोबत डझनभर सिनेमे केले आहेत. ही जोडी ऑनस्क्रिनच नव्हे तर ऑफस्क्रिनसुध्दा खूप क्युट दिसत होती. दोघांना कायमसाठी एकमेकांच्या आयुष्यात येण्याची ईच्छाही होती आणि त्यानंतर मग त्यांनी काही लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा सुद्धा केला होता.

पण जेव्हा गोविंदा आणि नीलम कोठारीचे हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा त्याची पत्नी व आई खूप चिडली होती. त्या इतका सं’तापल्या होत्या की त्यांनी गोविंदाला नीलमबरोबर चित्रपट करण्यास बंदी घातली. गोविंदाने स्वत: एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. म्हणून त्याचे जग कोसळण्याच्या मार्गावर होते. पण त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मग गोविंदाबरोबर अपयशी ठरल्यानंतर तिने 2000 मध्ये बँकॉकमध्ये ऋषि सेठियाशी लग्न केले. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. 2007 मध्ये त्याने तिला घ’टस्फो’ट दिला. त्यानंतर तिने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनीशी लग्न केले. या जोडीने लग्नानंतर अहाना नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीने सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. बर्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करणारी नीलम आता हिर्यांच्या धंद्यात खूप व्यस्त आहे. नीलमचे मुंबईत डायमंड आणि ज्वेलरीचे मोठे दुकान आहे. गोविंदा नंतर बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलबरोबरही तिचे नाव जोडले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12