‘या’ ३५ वर्षीय प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, फोटो समोर आल्यानंतर झाला खुलासा….

‘या’ ३५ वर्षीय प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, फोटो समोर आल्यानंतर झाला खुलासा….

अवघाची संसार या मालिकेने त्याकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अभिनेत्री नेहा जोशी घराघरात पोहोचली. त्यानंतर झेंडा, प्रेम म्हणजे प्रेम असतं, नाती, पोस्टर बॉयज, पोस्टर गर्ल्स, लालबगची राणी, बघतोस काय मुजरा कर, न्यूड आणि फर्जंद सारख्या सुपरहिट मराठी सिनेमात आपल्या खास अभिनयाची छाप सोडणारी नेहा मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नेहा जोशीची लोकप्रिय आहे. नेहाचा चांगलाच मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अधून मधून पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आणि आता नेहाने तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे.

नेहा जोशी नुकतंच विवाहबंधनात अडकली आहे. नेहा जोशीने लगीनगाठ बांधली आहे. आपल्या लग्नाचे अनेक फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकी मोठी सेलेब्रिटी असून देखील कोणताही गाजावाजा न करता तिने लग्न केले आहे. आपल्या प्रायव्हसीला प्राधान्य देत तिने आपला लग्नसोहळा खूपच खाजगी ठेवला.

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिने लग्न केले त्यामुळे देखील सोशल मिडियावर तिची चर्चा सुरू आहे. तस तर नेहा जोशी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नेहाने नुकतंच इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नातील काही फोटो पोस्ट केले आहे. यामधील एका फोटोमध्ये नेहाने मुंडावळ्या बांधल्या आहेत.

नववधूच्या वेशात नेहाच सौंदर्य अधिकच खुलून आल्याच पाहायला मिळत आहे. “माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका”, असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. आपल्या नवऱ्यासोबत तिने तिचा दुसरा फोटो शेअर केला आहे.

हातात हिरवा चुडा, नाकात नथ, ओजर टिक आणि केसांचा भला मोठा चुडा व सोबतीला तिचा साथीदार यामुळे दुसरा फोटो चाहत्यांच्या अधिकच पसंतीस उतरला आहे. नेहाच्या पतीचे नाव ओमकार कुलकर्णी असे आहे. ‘अखेर लग्नबंधनात अडकली’, अस कॅप्शन तिनं या फोटोला दिल आहे. नेहाच्या लग्नाचे सुदंर फोटोही आता समोर आले आहे.

या फोटोंवर चाहते सध्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, एक महानायक – डॉ बी आर आंबेडकर या चित्रपटामुळे नेहाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. माघील जवळपास एक -दीड वर्षांपासून नेहा जोशी चांगल्या प्रोजेक्टच्या शोधत आहे.

आजवर विविध भूमिका साकारून आता नेहा हटके आणि उत्तम भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. आणि आता तर नेहाच लग्न झालं आहे. त्यामुळे लग्नानंतर ती अभिनय करणार की मनोरंजनसृष्टीला राम राम ठोकणार याबद्दल अजून कोणतीच बातमी समोर आली नाहीये.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.