साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने कबूल केला इस्लाम धर्म, स्वतःचे नाव बदलत अश्या प्रकारे बनली ‘रहिमा’…

या जगामध्ये अनेक असे धर्म आहेत, ज्यांच्या धर्माचे नियम हे वेगवेगळे आहेत. जगाच्या पाठीवर मुस्लिम, ख्रिश्चन हे खूप मोठ्या लोकसंख्येचे असलेले धर्म आहेत, तर हिंदू धर्म हा बहुतांश भारतामध्ये आढळतो. मात्र, हिंदू धर्माचे लोक हे जगभरामध्ये सगळीकडे आढळतात. अनेक जण आपापल्या धर्माचे पालन करत असतात.
मात्र, काहीजण त्यांचा धर्म सोडून इतर धर्मामध्ये प्रवेश करत असतात. धर्मांतर करणे हे आपल्या इच्छेचा प्रश्न असतो. तर काही ठिकाणी ज’बरद’स्ती धर्मांतर झाल्याचे आपण घटना ऐकल्या असतील. ज्या व्यक्तीशी ज’बरद’स्तीने धर्मांतरे झाली असेल तर त्या व्यक्तीला विचारण्यात येते आणि त्या व्यक्तीने जर सांगितले की, आपले ज’बर’दस्ती धर्मांतर झालेले आहे तर त्या व्यक्तीला पुन्हा मूळ धर्मात आणता येऊ शकते.
भारतामध्ये देखील अनेक लोक आपला मुळ धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेले आहेत. याची कारणं देखील वेगवेगळे आहेत. त्या लोकांना त्यांनी जो धर्म स्वीकारला आहे, तो धर्म खूप आवडला आहे असे देखील एका अहवालात प्रकाशित करण्यात आले होते.
बॉलिवूडमध्ये देखील अशाच काही घटना घडल्या आहेत आणि अभिनेता व अभिनेत्री आपला मुळ धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण संगीतकार ए. आर. रहमान यांचे घेऊ शकतो. संगीतकार रहमान यांचे मूळ नाव आहे दिलीप कुमार असे होते.
मात्र, त्यांना कुठलातरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी नंतर इ’स्लाम धर्म स्वीकारला. ते इ’स्लाम धर्माचे पाईक आहेत. ए आर रहमान यांचे नाव आज जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. त्यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांची विशेष अशी गाणी सर्वत्र चर्चेचा विषय असतात. रहमान यांनी ऑस्करपर्यंत मजल मारली आहे त्यानंतर याआधी युवान शंकर यांनी देखील इ’स्लाम धर्म स्वीकारला आहे.
आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने देखील नुकताच इ’स्लाम धर्म स्वीकारलेला आहे. या अभिनेत्रीने जवळपास 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तामिळ, कन्नड, तेलुगू या चित्रपटात देखील काम केले आहे. या अभिनेत्रीचे नाव ‘मोनिका सिलंथ’ असे असून ती दक्षिण भारतातील खूप मोठी अभिनेत्री आहे.
तिने आजवर अनेक चित्रपट केले असून तिचे सर्व चित्रपट हिट झाले आहेत. मोनिका आपल्या इ’स्लाम धर्म स्वीकारणे बाबत म्हणते की, मी 2010 पासून इ’स्लामचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याआधी मला इ’स्लाम हा चांगला धर्म नाही, असे सांगण्यात आले होते.
त्यामुळे माझे गैरसमज होते. मात्र, ज्या वेळेस मला असे समजले की, इ’स्लाम धर्म हा अतिशय चांगला धर्म आहे, त्यानंतर मी इ’स्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आता हा धर्म स्वीकारल्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर राहणार आहे. मी चित्रपट कधीही करणार नाही, असे देखील तिने सांगितले. मोनिका हिने आता ए जी, रहिमा असे नाव धारण केले आहे. तिच्या या धर्मांतरावर अनेकांनी टीका देखील केली आहे. तसेच सोशल मीडियावर तिला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे.