मलायका अरोराच्या मुलानं चार-चौघात सलमानला केली होती मा’रहाण ! पहा अखेर अरबाजने मध्यस्थी येऊन मुलाला…

मलायका अरोराच्या मुलानं चार-चौघात सलमानला केली होती मा’रहाण ! पहा अखेर अरबाजने मध्यस्थी येऊन मुलाला…

सलीम खान यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. चर्चांचे कारण वेगळं असत, मात्र बातम्यांमध्ये कायमच खान कुटुंबातील कोणती तरी एक व्यक्त कायमच झळकत असते. त्याचे कारण देखील तसेच आहे. कुटुंबातील सर्वच जण सेलेब्रिटी आहेत, म्हणून ते प्रकाशझोतात असणे सहाजिकच आहे. त्याच्या कुटुंबातील एक साधारण किस्सा देखील मोठी बातमी बनते.

खास करून तो किस्सा जेव्हा सलमान खानशी संबंधित असतो. अनेकवेळा काही किस्से समोर नाही येत. आणि बऱ्याच काळानंतर त्याबद्दलचा खुलासा होतो. असाच एक किस्सा नुकताच सलमान खानने स्वतः सांगितला आहे. सध्या सलमान खान आपल्या ‘अंतिम’ सिनेमासाठी जोरदार चर्चेत आहे. मराठी सिनेमा ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असणाऱ्या अंतिम सिनेमामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील आहे.

आयुषचा हा दुसरा सिनेमा आहे. यामध्ये सलमान खान सोबत त्याचे काही फाईट सिन आहेत. सलमान खानसोबत असे सिन देत असताना नक्की काय वाटलं, असा प्रश्न त्याला अनेकांनी विचारला. त्यावेळी मला सलमान भाईला मा’रताना चांगलीच भी’ती वाटली होती, असं आयुषने सांगितले.

त्यावरूनच, सलमानला एका रिपोर्टनरने मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला की, ‘कधी असं झालं आहे का कि खोट्या फाईट सीनमुळे तुला कोणाची भीती वाटली?’ त्यावर सलमान ने एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, ‘मला भीती तर नव्हती वाटली. पण एक असा किस्सा आहे, एका फाईट-सीनमुळे मला चांगलाच मार खावा लागला होता.’

याबद्दलच सांगताना सलमान पुढे बोलला, ‘दंबग’ सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला एका फाईट-सिन नंतर चांगलाच मार खावा लागला होता. २०१० मध्ये ‘दंबग’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अरबाज आणि माझे काही हटके नाते दाखवण्यात आले आहे. कधी प्रेम तर कधी एकमेकांसोबत भांडण असं त्या सिनेमामध्ये दाखवले आहे.

त्यावेळी त्याचा मुलगा अरहान केवळ ८ वर्षांचा होता. अरबाज आणि माझा फाईट सिन सुरु होता. त्यामध्ये मी अरबाजला चांगलाच चोप दिला होता. तो सिन शूट करत असताना अरहान तिथेच होता. सिन संपला आणि त्यानंतर त्याने मला मा’रायला सुरुवात केली. त्याने मला चांगलाच मारलं.

मी त्याला विचारलं अचानक तुला काय झालं बेटा? तू मला मारत का आहे? तेव्हा तो मला म्हणाला, तुम्ही माझ्या पप्पाला किती मारलं? माझ्या पप्पाना मारलं म्हणून मी तुम्हाला मारत आहे. त्याच्या निरागस प्रेमावर आम्हाला हसायला आलं. मी अरबाजला बोलवलं आणि मिठी मारत अरहानला सांगितलं की ते सर्व खोटं होत. आम्ही शूटिंग करत होतो.

त्यानंतर सलमान आणि अरबाजने मिळून अरहानला पूर्ण सिन दाखवला आणि मग त्याचा राग शांत झाला. आठ वर्षांच्या अरहानने शूटिंग सुरु असतानाच सगळ्यांसमोर आपल्या काकाला म्हणजेच सलमान खानला मारलं होत. हाच किस्सा सलमानने आपल्या मुलखाती दरम्यान सांगितला. किस्सा सांगत असताना देखील सलमान लोट-पोट होऊन हसत होता.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.