महेश भट्ट यांच्या त्या कृत्याने रात्रभर रडत होती अभिनेत्री कंगना, वाचून हैराण व्हाल…

बॉलीवुड चित्रपट नगरी खरच एक मायानगरी आहे. येथे पोहोचणारा प्रत्येक माणूस खूपच खस्ता खाऊन पोहोचतो. प्रत्येक म्हणता येणार नाही कारण आता नेपोटीझम मुळे तुम्हाला माहीतच असेल. पण जो ही या क्षेत्रात येतो तो बॉलीवूडच्या रंगात रंगून जातो. बॉलीवुड ची दुनिया सर्वांनाच आकर्षित करते.
येथे करियर मिळेल या आशेने शेकडो युवक येथे येतात काही जण यशस्वी होतात परंतु काहींच्या हाती मात्र काहीच लागत नाही. बॉलीवूड मध्ये जाणे एवढे सोपे नाही. रोज मुंबईमध्ये हे कित्येक लोक चित्रपट नगरीत काम मिळेल या आशेने येत असतात. परंतु हळूहळू त्यांचे हे स्वप्न तुटू लागतात. कारण बॉलीवूड मध्ये जाणे एवढे सोपे असते तर असे खूप स्टार झाले असते ज्यांना कलाकार व्हायचे आहे.
एखादी नवीन व्यक्ती येथे आली तर येथे काम करत असलेली जुनी व्यक्ती म्हणजेच कलाकार हे त्याला आपण सध्या करत असलेल्या स्ट्रगल विषय सांगतात तेव्हा, नवीन आलेला व्यक्ती या विचारात पडून जातो की आपण नवीन आहोत हे करणे आपल्यासाठी चांगले असेल की नाही. हे ऐकल्यानंतर त्या नवीन आलेल्या व्यक्तीच्या अंगात स्ट्रगल करण्याचा अजिबात त्राण शिल्लक राहत नाही.
हे तर तुम्हाला कळलेच असेल की बाहेरून येणाऱ्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये आपला दम बसवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागत असणार. या कलाकारांचा स्ट्रगल स्टार किड्स पेक्षा अधिक प्रमाणात असतो. याच बाहेरून येणाऱ्या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे कंगना राणावत आहे जिच्याविषयी आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
कंगना आपल्या कामामुळे आणि आपल्या चित्रपटांमुळे खूपच चर्चेत असते. परंतु आत्ताच नवीन विषयावरती येऊन ती बोलू लागली आहे. बॉलिवूडमधील खरे पणा ती लोकांसमोर स्पष्ट करत आहे यामुळे देखील ती खूपच चर्चेत आहे. कुठलाही मुद्दा असो कंगना त्यावर निर्भीडपणे बोलत असते.
हा किस्सा कंगना ची बहीण रंगोली ने खूप अगोदर पासून ट्विटरवर शेअर केला होता. हा किस्सा दिग्दर्शक महेश भट यांच्याशी जोडला गेलेला आहे. रंगोली ने सांगितले की एकदा महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती. रंगोली ने यामध्ये सांगितले होते की कंगनाची यादरम्यान काय हालत झाली होती. रंगोली ने खूप अगोदर या घटनेचा ट्विटरवर उल्लेख केला होता.
या ट्विटमध्ये रंगोली ने हे सांगितले होते की पहा कशाप्रकारे 19 वर्षाच्या कंगनावर महेश भट रागावले आहे. त्यांनी रागाच्या भरात कंगनावर चप्पल फेकून मारली आहे. कंगनाने काही काळापूर्वी आलियाची कानउघडणी केली होती. ज्यानंतर आलिया ने देखील कंगनाला चांगलेच सुनावले होते.