लवकर लग्न करून ‘या’ अभिनेत्रींनी लावून घेतली करीयरची वाट ! नंबर ‘४’ च्या अभिनेत्रीने पहिला चित्रपट हिट गेला म्हणून केले लग्न..!

लवकर लग्न करून ‘या’ अभिनेत्रींनी लावून घेतली करीयरची वाट ! नंबर ‘४’ च्या अभिनेत्रीने पहिला चित्रपट हिट गेला म्हणून केले लग्न..!

बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनेता किंवा अभिनेत्री यांनी लग्न केले असल्यास लपून ठेवायचे. मात्र, कालांतराने हा ट्रेंड बदलला. लग्न केल्यानंतर सर्व अभिनेता व अभिनेत्री हे आपल्या बद्दल सांगू लागली. मात्र, काही अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर आपल्या करिअरला दूर ठेवून संसारामध्ये रममाण होण्याला पसंती दिल्याचे दिसते. यामध्ये काही दिग्गज अभिनेत्री यांचा देखील समावेश आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. त्यांनी लग्नानंतर आपल्या करिअरवर पाणी सोडले.

1-ट्विंकल खन्ना : ट्विंकल खन्ना हिने 1995 मध्ये बॉबी देओल सोबत बरसात या चित्रपटात पदार्पण केले होते. हा चित्रपट या वेळी प्रचंड गाजला होता. त्यानंतर देखील ट्विंकल खन्ना हिने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, 2001 मध्ये तिने अक्षय कुमार सोबत लग्न केले. त्यानंतर तिने जवळपास चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. ती एक फॅशन डिझायनर आहे.

2- सोनाली बेंद्रे : सोनाली बेंद्रे हिने 1994 मध्ये आग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात गोविंदाची भूमिका होती. सोनाली हिने अजय देवगन, शाहरुख खान यांच्यासह दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. सोनाली बेंद्रे हिने 2002 मध्ये गोल्डी बहल या दिग्दर्शकासोबत लग्न केले. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

3-असिन : 2008 मध्ये आलेला आमिर खानचा गजनी चित्रपट आपल्याला आठवत असेल.यामध्ये असीन हिने काम केले होते. त्यानंतर देखील तिने काही चित्रपटात काम केले. 2016 मध्ये तिने मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा सोबत लग्न केले. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

4-भाग्यश्री: भाग्यश्री चे खरे नाव भाग्यश्री पटवर्धन असे आहे. तिने सलमान खान च्या मैने प्यार किया या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने काही चित्रपटात काम केले. मात्र, त्यानंतर तिने हिमालया दासानीसोबत लग्न केले. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे.

5-सायरा बानो: सायरा बानो यांनी 1959 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या सोबत लग्न केले आहे. आजही दोघेही एकत्र आनंदाने राहतात.

6-मीनाक्षी शेषाद्री: मीनाक्षी शेषाद्री हिने सनी देओल, अनिल कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून ती आता अमेरिकेत राहते. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.

7- जेनेलिया डिसूझा: जेनेलिया डिसूझा हिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. 2003 मध्ये तिचा रितेश देशमुखसोबत तुझे मेरी कसम हा चित्रपट आला. त्यानंतर दोघांनीही 2012 मध्ये लग्न केले. त्यानंतर जेनेलिया डिसूजा हिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12