Laal Singh Chaddha : सिनेमात १६ वर्षांनी लहान ‘या’ अभिनेत्रीने साकारली आहे अमीर खानच्या आईची भूमिका..पहा दिसते अतिशय हॉट

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूड मध्ये आमिर खानला ओळखले जाते. त्याचे कारण देखील तसेच आहे. आमिर खान वर्षातून एकच सिनेमा बनवतो, पण त्या सिनेमासाठी तो आपला पूर्ण वेळ देतो. मुख्य म्हणजे जोपर्यंत एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट, कथानक त्याला आवडत नाही तो सिनेमा करण्यासाठी तैयारच होत नाही.
आणि ज्यावेळी तो सिनेमा करण्यासाठी आमिर तैयार होतो, तो आपला संपूर्ण वेळ केवळ त्याच सिनेमासाठी देतो. मुख्य पात्र रेखाटण्यासाठी तो हवे ते सर्व परिश्रम घेतो. आणि ज्यावेळी सिनेमामध्ये तो दिसतो, तेव्हा त्या पात्राशी एकरूप असाच बघायला मिळतो. त्याने घेतलेल्या परिश्रमामुळेच त्याचे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि भरगोस कमाई करतात.
सध्या फॉरेस्ट गंप या हॉलीवूडमधील सुपरहिट सिनेमाचा रिमेक तो बनवला आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’ असं या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमामध्ये आमिर खानसोबत करीना कपूर काम करत आहे. त्यामुळे थ्री इडियट्स सिनेमामध्ये त्यांच्या जोडीने जी कमाल केली होती, ती पुन्हा एकदा बघायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
मात्र, थ्री इडियट्स मधलीच अजून एक अभिनेत्री या सिनेमामध्ये काम करत आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. हि अभिनेत्री इतर कोणी नसून, टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाने धम्माल करणारी मोना सिंग आहे. थ्री इडियट्स मध्ये मोना सिंगने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता लाल सिंग चढ्ढा सिनेमामध्ये देखील ती महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
या सिनेमामध्ये, मोना सिंग चक्क आमिर खानच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. आमिर खान ५६ वर्षांचा आहे, तर मोना सिंग केवळ ४० वर्षांची आहे. म्हणजेच मोना सिंग, आमिर खानपेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. याबद्दलची माहिती देता असताना सूत्रांनी सांगितले की, सिनेमामध्ये मोना सिंग आमिर खानच्या आईची भूमिका साकारणार आहे.
पण त्यामुळे फारसा फरक बघायला मिळणार नाही. मोना सिंग एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमामध्ये काम केले आहे.टेलिव्हिजन वर अनेक मालिकांमध्ये मोनाने काम केलं आहे. जस्सी जैसी कोई नाही या मालिकेमधून तिला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर झलक दिख लाजा हा डान्स रियालिटी शो देखील तिने जिंकला होता.
क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो, राधा कि बेटीया कुछ कर दिखायेगी, कवच-काली शक्तियो से सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सोबतच टीव्हीएफच्या ये है मेरी लाईफ या मिनी सिरीजमध्ये देखील ती झळकली होती. एएमडीबी रेटिंग्समध्ये ये है मेरी लाईफ हि सिरीज, भारतातील पहिल्या पाच उत्कृष्ट सिरीजपैकी एक आहे.
अभिनयाच्या बाबतीत मोना सिंगने नेहमीच भल्या भल्या कलाकरांना माघे टाकले आहे. त्यामुळे आता ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये आमिरच्या आईच्या भूमिकेत मोना सिंग कशी दिसते हे बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.