KGF स्टार यशने खास अंदाजात साजरा केला पत्नीचा वाढदिवस, पहिल्यांदाच समोर आले त्याच्या पत्नीचे फोटो, पहा दिसते अतिशय सुंदर आणि हॉट..

KGF स्टार यशने खास अंदाजात साजरा केला पत्नीचा वाढदिवस, पहिल्यांदाच समोर आले त्याच्या पत्नीचे फोटो, पहा दिसते अतिशय सुंदर आणि हॉट..

सध्या सगळीकडेच साऊथच्या अभिनेत्यांच्या बोलबाला बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनने आपल्या पत्नी आणि मुलांसोबत लग्नाचा अकरावा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या सोशल मीडियावर त्याने, केक कापतानाचे काही फोटोज शेअर केले होते. ते फोटो शेअर होताच काही वेळातच सगळीकडे तुफान वायरल झाले.

यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. अल्लू अर्जुनला अजून एक साऊथचा सुपरस्टार लोकप्रियतेच्या बाबतीत तगडी टक्कर देतो. अभिनेता यश बॉलीवूडमध्ये देखील आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा केजीएफ सिनेमा प्रदर्शित झाला होता.

साऊथमध्ये तर सोडाच, देशात सगळीकडेच या सिनेमाला अनपेक्षित यश प्राप्त झाले आणि या सिनेमातून यश देखील प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. तेव्हापसूनच यशच्या नावाची चांगलीच चर्चा रंगते. यश बद्दल अगदी साध्या साध्या गोष्टी देखील चर्चेचा मुद्दा ठरतात. आता पुन्हा एकदा यशाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कारण देखील तसेच आहे. नुकतंच यशने आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला. आणि प्रथमच यश आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत असा कार्यक्रम साजरा करत असतानाचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच प्रसिद्ध ठरत आहेत. यश ची पत्नी राधिका पंडित देखील एका अभिनेत्रीच आहे.

राधिका आणि यश हे जोडपे केवळ साऊथ इंडस्ट्रीमधेच नाही तर, सगळीकडेच चांगेलच आवडतं आहे. दोघांची प्रेमकहाणी देखील अगदी फिल्मी आहे. राधिका आणि यश दोघांनीही लग्नापूर्वी अनेक सिनेमामध्ये सोबत काम केलं होत. ७ मार्च १९८४ रोजी राधिका पंडितचा जन्म बंगळूरमध्ये झाला होता.

मॉडेलिंग आणि सिनेमामध्ये राधिका आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असताना २००४मध्ये ‘नंदगोकुला’ या टीव्ही शोच्या दरम्यान तिची आणि यशची ओळख झाली. त्यानंतर २००८मध्ये त्यादोघांनी मोग्गीना माणसू या सिनेमात सर्वात पहिले काम केले. त्याच्या पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांना त्यांची जोडी कमालीची आवडली.

ड्रमा, मिस्टर आणि मिसेस रामाचारी, संथू स्ट्रेट फॉरवर्ड सारख्या सिनेमात त्या दोघांनी सोबत काम केले. मिस्टर आणि मिसेस रामाचारी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळीच दोघांना एकमेकांसाठी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. आणि यशने थेट फोन करत राधिकाला प्रपोज केलं. राधिकाला देखील यश आवडत होता, मात्र तिने जवळपास सहा महिन्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.

आणि त्यानंतर २०१६मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. नुकतंच अभिनेत्रीने आपला ३८वा वाढदिवस साजरा केला. आपले दोन्ही मुलं आणि पती यश सोबत तिने मोठ्या थाटात आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी राधिका खूपच सुंदर आणि क्युट दिसत होती. केक कापताना पती यश सोबत मुलगी आयरा आणि मुलगा अथर्व देखील सोबत होते. त्यावेळी राधिकाने गडद मरुन कलरचा अगदी सिम्पल असा वन पीस घातला होता. त्यामध्ये तीच सौंदर्य अजूनच खुलुन दिसत होत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.