‘झुंड’ चित्रपटावरून केदार शिंदेंनी केलेले ट्वीट चर्चेत, म्हणाले; “जात..जात नाही तोवर…”

‘झुंड’ चित्रपटावरून केदार शिंदेंनी केलेले ट्वीट चर्चेत, म्हणाले; “जात..जात नाही तोवर…”

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट ४ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भुमीकेत आहेत. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यामुळे आणि यामध्ये महानायक बिग बी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सैराटची संपूर्ण टीम एकत्र आली. चित्रपटाच्या कथानकाचे अनेक दिग्ग्ज कलाकारांनी कौतुक केलं आहे. त्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आघाडीवर आहे. त्याने त्याच्या घरी चित्रपटाच्या टीमला बोलावून त्यांचे विशेष कौतुक त्याने केले.

त्याचबरोबर चित्रपटाचे कथानक त्याला एवढे आवडले कि त्याने थेट संधी मिळाली तर नागराजच्या चित्रपटात काम करेल अशी ईच्छा बोलून दाखवली. पुढे तो म्हणाला कि, जे आम्ही गेल्या १५-१६ वर्षात केले नाही ते नागराजने करून दाखवले, तसेच त्याने आकाश ठोसच्या भूमिकेचे देखील कौतुक केले.

दरम्यान, साऊथ सुपरस्टार धनुषने देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. चित्रपट पाहून तो म्हणाला कि, हा चित्रपट पाहून मी स्तब्द झालोय, चित्रपटातील कलाकारांचे जेव्हडे कौतूक करावं तेवढं कमीच, त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय देखील उत्तम आहे. यात मराठी कलाकारही मागे नाहीत.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यानंही नागराज मंजुळेच्या या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत जितेंद्र जोशी याने या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आता यामध्ये आणखी एका मराठी कलाकाराचे नाव सामील झाले आहे, मराठीतील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे जरा वेगळ्या शब्दात कौतुक केलं आहे.

चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत केदार शिंदे म्हणाले, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” केदार शिंदे यांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.