Katrina-Vicky Wedding : सासरी पोहचली कॅट, अशी लाजली ‘सुंदर मनाची वधू’ ! बघा video

Katrina-Vicky Wedding : सासरी पोहचली कॅट, अशी लाजली ‘सुंदर मनाची वधू’ ! बघा video

सध्या सगळीकडेच, लगीनघाई बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर सगळीकडेच अनेकांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडियो बघायला मिळत आहेत. अलीकडेच अनेक मोठाल्या नेत्याच्या घरी देखील सनई वाजली. केवळ साधारण लोकांमध्येच नाही तर सध्या अनेक सेलिब्रिटीज देखील लग्नबेडीत अडकत आहेत.

काही दिवसांपूर्वी, रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले होते. पण अचानकच त्यांच्या लग्नाच्या बातम्या बंद झाल्या, तरी अजून एका बॉलीवूड सेलेब्रिटी जोडप्याच्या लग्नाच्या बातम्यांनी सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगवली आहे. कॅटरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

कॉफी विथ करणच्या चॅट-शो मध्ये करणने विकीला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने कॅटरिनाचे नाव घेतले होते. शिवाय करणने त्याला पुढे प्रश्न विचारला होता की, खरोखर कॅटरिनासोबत तूला डेट वर जायला मिळाले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल, त्यावर आपण आनंदाने बेशु’द्ध होऊ असं विकी बोलला होता.

तेव्हापासून त्या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. २०१९मध्ये एका दिवाळी पार्टीमध्ये त्या दोघांना सोबत बघण्यात आले होते. तेव्हापासूनच विकी आणि कतरिनाच्या अफे-अरच्या चर्चा रंगल्या होत्या. नक्की कॅट आणि विकीच लग्न होणार का? इथपासून चर्चा सुरू होत्या. पण सोमवारी या सर्वच चर्चाना पूर्णविराम लागला असून ७ आणि ८ डिसेंबरला त्या दोघांचं लग्न होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

सोमवारी विकीच्या घरी, कॅटरिना आणि तिच्या कुटुंबासाठी खास जेवणाची मेजवानी आयोजित केली होती. यावेळी कॅटरिना आपल्या आई, बहीण आणि भावासोबत विकीच्या घरी म्हणजेच आपल्या होणाऱ्या सासरी गेली होती. त्यावेळी कॅमेरामध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तीच लाजणं अगदी योग्य वेळेवर कैद झालं. यावरून आता ७ आणि ८ म्हणजेच उद्या आणि परवा त्या दोघांच्या लग्नाच्या खास विधींना सुरुवात होणार आहे.

आपल्या सासरी पोहोचलेल्या कॅटरिनाने मीडियापासून काही अंतरच राखले. शिवाय मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे देखील टाळले. यावेळी कतरिनाने सुंदर अशी क्रीम रंगाची साडी घातली होती. साडीमध्ये नेहमीप्रमाणे कॅटरिना अधिकच सुंदर दिसत होती. कॅटरिनाला तिच्या लग्नाबद्दल खास करून विकी बद्दल प्रश्न विचारला तेव्हा, कॅटरिना एखाद्या नववधू सारखी लाजली.

त्यामुळे आता हा व्हिडियो सगळीकडेच तुफान वायरल होत आहे. कॅटरिना काल एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी आपल्या चाहत्यांच्या आग्रहाखातर तिने एक सेल्फी दिला होता. त्या युझरने तोच सेल्फी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. त्यामधी ‘सुंदर मनाची वधू’ असं कॅप्शन टाकलं होत. आता सध्या सगळीकडे याच कॅप्शनचा वापर करत, कॅटरिनाचे फोटो वायरल होत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.