Mother’s Day : एका चाहत्याच्या आग्रहास्तव करिनाने पहिल्यांदा शेअर केला आपल्या दुसऱ्या बाळाचा फोटो, पहा बाळाची झलक…

Mother’s Day : एका चाहत्याच्या आग्रहास्तव करिनाने पहिल्यांदा शेअर केला आपल्या दुसऱ्या बाळाचा फोटो, पहा बाळाची झलक…

आज सगळीकडेच. जागतिक मातृ दिवस साजरा केला जात आहे. संपूर्ण देशातच नाही तर जगात देखील सोशल मीडिया आणि इतर सर्व प्लॅटफॉर्म वर मातृ-दिनाच्या शुभेच्छा देण्याचे सत्र सुरु आहे. काय सर्व-सामान्य आणि काय सेलिब्रिटीज सगळेच आपल्या आईसोबत, आपल्या मुलांसोबत आपले फोटो, आपल्या आठवणी, किस्से सांगत आपला हा मातृदिवस खास बनवत आहेत.

सर्वांसाठीच हा दिवस अगदी खास असतो. आई आपल्या मुलांसाठी जे नेहमीच काही तरी खास करत असते तेच मुलं आज आपल्या आईसाठी काही तरी खास करुन आपले प्रेम व्यक्त करतात. सेलेब्रेटीज आपल्या आईसोबतच फोटोज शेअर करत आहेत, तर कोणी आपल्या मुलानी काय खास केले हे शेअर करत आहेत.

यात चाहत्यांसाठी मात्र, पर्वणीच आहे.. सोशल मीडियावर मातृदिनानिमित्त अनेक जण आपल्या आईला शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकरांनी आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करुन आजचा दिवस सुंदर बनवला आहे. सर्वत्र मदर्स डे चा उत्साह आहे. परंतु चाहत्यांच्या लाडक्या बेबोने मदर्स डे निमित्त एक खास सरप्राईज चाहत्यांना दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी, बेबो ने दुसऱ्या लेकराला जन्म दिला. तेव्हापासून गेली अनेक दिवस झले, तिचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, त्यांना करिनाने खुश केले आहे. करिनाने तिच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक सो’शल मी’डियावर शे’अर केली आहे. तिच्या दुसऱ्या बाळाला पाहूनदेखील तैमूर प्रमाणेच नेटकऱ्यांनी त्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

मदर्स डेचे निमित्त साधून करिनाने दिलेले हे सरप्राईज सर्वांनाच आवडलेले दिसत आहे. आता मोठा दादा झालेला तैमूर आपल्या हातात आपल्या छोट्या भावाला, तैमूरला घेऊन बसला आहे. आणि सध्या या दोन छोट्या नवाबांचा फोटो सो’शल मी’डियावर तु’फान व्हा’यरल होत आहे.

गेली अनेक दिवस सर्वांनाच करिनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्याची इच्छा होती. मदर्स डेच्या निमित्ताने करिनाने तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. ‘आज संपूर्ण दुनिया केवळ आशेवर अवलंबून आहे. माझ्या आयुष्यात हे दोघेच मला चांगल्या भविष्याची आशा देत आहेत.

सर्व सुंदर आणि स्ट्रॉग मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा’,अशी पोस्ट लिहित आपल्या दोन्ही मुलांच्या फोटोचे पोस्ट करिनाने शेअर केले आहेत. करिनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी करिनाला व तिच्या कुटुंबाला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. ‘फोटोची झलक तर दाखवली आता बाळाचं नावही सांगा’, अशा कमेंटचा नेटकऱ्यांनी वर्षाव केल्या आहेत.

करिनाचा पहिला मुलागा तैमुर हा जन्मल्यापासून अनेक वेळा चर्चेचा विषय बनला आहे. पापाराझिंच्या कॅमेरापासून तैमूर नेहमीच आपली सुटका करु पाहत असतो. तैमुरची सो’शल मी’डियावरही खूप चर्चा सुरु असते.

करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाला मात्र लाइमलाईट पासून दूर ठेवलेले पहायाला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी करिनाच्या वडिलांनी चुकून करिनाच्या दुसऱ्या बाळाचा फोटो सो’शल मी’डियावर पोस्ट केला होता. तो फोटो प्र’चंड व्हा’यरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12