‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं स्वतःशीच लग्न! म्हणाली; ‘मला शारीरिक सुखासाठी पुरुषाची गरज नाही तर मी स्वतःच..’

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं स्वतःशीच लग्न! म्हणाली; ‘मला शारीरिक सुखासाठी पुरुषाची गरज नाही तर मी स्वतःच..’

प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भावना असते. आपल्या जोडीदारावर प्रेम असेल आणि जोडीदाराचे देखील आपल्यावर प्रेम असेल तर जीवन अतिशय सुखदायक बनते. छोट्या छोट्या गोष्टीत देखील आनंद मिळतो. आपल्या जोडीदाराची साथ त्यामुळेच महत्त्वाची ठरते.

पण आपल्यापैकी सगळ्यांनाच आवडीचा जोडीदार मिळतोच अस नाही आणि आवडीचा जोडीदार मिळला तरी तो साथ देणारा असतोच अस नाही. बऱ्याच वेळा त्यामुळे अनेकजण लग्न करायला धजत नाहीत. कोणाकडून धोका मिळू नये म्हणून मध्यंतरी गुजरात मधील एका मुलीने अनोखी शक्कल लढवली.

गुजरातमधील वडोदरा येथील क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने जून महिन्यात स्वतःशीच लग्न केलं होतं. स्वतःशी लग्न करण्याला सोलोगॅमी असं म्हटलं जातं. आणि आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यावेळी एका सेलेब्रिटीने अस केलं आहे. ही सेलेब्रिटी स्वतःसोबतच विवाह बंधनात अडकली आहे.

‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कनिष्का सोनी स्वतः सोबतच लग्न केलं आहे. याबद्दलची अधिक माहिती देत कनिष्काने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडिया वरती कनिष्का बऱ्यापैकी सक्रिय असते. आपले वेगवेगळे पोस्ट फोटोज शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कनिष्काने ‘पवित्र रिश्ता’, ‘देवी आदि पराशक्ती’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. छोट्या पडद्यावर छोट्या- मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कनिष्काने हॉलिवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडली होती. आणि आता तिच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.

मात्र तिनं स्वतः सोबतच लग्न केलं असल्याच समजताच चाहत्यांना मोठा ध’क्का बसला आहे. आपल्या लग्नाबद्दलच्या पोस्टमध्ये कनिष्काने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलं की, “माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. माझ्यावर इतकं प्रेम करणारे आणि मला माझ्यापेक्षा प्रामाणिक कोणीही सापडत नाहीये.

स्वतःपेक्षा उत्तम साथीदार आणि प्रेम करणार कोणी सापडू देखील शकत नाही. त्यामुळेच आता मी फक्त माझ्याशीच कमिटेड आहे.” पोस्टमध्ये अजून एक फोटो शेअर करत तिने लिहिलं की, “माझ्या आयुष्यात माझे स्वप्न मीच पूर्ण केले आहेत. मी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी स्वतःशी लग्न केले. मी माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती आहे.

माझं स्वतःवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मला माझ्या आयुष्यात इतर कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी एकटी आणि माझ्या गिटारसह खूप आनंदी आहे. मी देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे. शिव आणि शक्ती अस सर्व काही माझ्यातच सामावलेले आहेत,” असं कनिष्काने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कनिष्का सोनीने तिचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे. कनिष्काच्या लग्नाबद्दल समजताच अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. मात्र कनिष्काने आपण या गोष्टीची पर्वा करत नाही असं म्हणल आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.