कास्टिंग काऊच वर कंगनाचा खुलासा, म्हणाली हिरोसोबत झोपल्यानंतरच…

कास्टिंग काऊच वर कंगनाचा खुलासा, म्हणाली हिरोसोबत झोपल्यानंतरच…

राज्यसभा संसद मध्ये जया बच्चन यांनी दिलेले भाषण खूपच चर्चेत आहे. जयाने सांगितलेल्या काही गोष्टींमुळे कंगना ने पण जया बच्चन वर निशाणा साधला आहे. कंगनाने जया बच्चन यांच्या “जिस थाली मे खाते है उसमे ही छेद करते है।” या गोष्टीला पकडले आहे आणि याद्वारे तिने इंडस्ट्रीत एक नवा खुलासा केला आहे. कंगनाने इंडस्ट्रीवर डायरेक्ट हे आरोप लावले की अभिनेत्रींना हिरो सोबत झोपल्या नंतरच काम मिळते.

सोमवारच्या लोकसभा मान्सून सत्राच्या पहिल्या दिवशी रवी किशन यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स वापरण्याचा मुद्दा ठेवला होता आणि त्याविषयी योग्य ती कारवाई करावी अशी आशा व्यक्त केली होती. संसद मध्ये दुसऱ्या दिवशी जया बच्चन यांनी रवीकिशन यांच्या या गोष्टीला उत्तर दिले. त्यानंतर हा मुद्दा खूपच चर्चेचा विषय बनला. या विवादामध्ये आता कंगना रणावत सुद्धा मध्ये पडली आहे. संसद मध्ये जयाने जी पण गोष्ट सांगितली त्यावर कंगना सोशल मिडीयाद्वारे एक एक प्रश्नाचे उत्तर देत आहे.

याचा अर्थ असा आहे की जया यांनी बिना नाव घेता कंगना आणि रवीकिशन दोघांवर निशाणा साधला आहे. जया बच्चन यांनी या दरम्यान असे सांगितले होते की मनोरंजन उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोक सोशल मीडियाद्वारे प्रभावित होत आहे. ज्या लोकांनी इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले आहे ते आता याला गटर म्हणत आहे मी पूर्णपणे या गोष्टीला असहमत आहे. ज्या थाळीमध्ये लोक जेवण करतात त्या मध्येच छेद करतात.

जया यांनी पुढे असे सांगितले की मी सरकार कडून अशी आशा व्यक्त करते की त्यांनी अशा लोकांकडून ही अशा प्रकारची भाषा वापरण्यास सक्त मनाई करावी. यानंतर जया यांनी असे विधान केले त्यानंतर कंगनाने सोशल मीडियाद्वारे त्यांना असे प्रत्युत्तर दिले की जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीजने आम्हाला काय दिलं आहे एक काम दिलं होतं ज्यामध्ये दोन मिनिटांचा आइटम सॉन्ग आणि एक रोमँटिक सीन मिळत होता.

पुढे कंगनाने असे लिहिले आहे की हे सर्व मिळत होती परंतु ते पण हिरोसोबत झोपल्यानंतर हे सर्व तिने आपल्या सोशल मीडिया वर ट्विट केले आहे. कंगना जयाजी यांच्या “जिस थाली मे खाते हो उसी मे ही छेद करते हो” यावर प्रत्युत्तर देताना असे म्हटले की, मी इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला आहे माझी थाळी स्वतः देशभक्ती आणि महिलाप्रधान चित्रपटांनी सजवली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *