लग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का?

सामान्यत: लग्नानंतरच प्रत्येक महिला ती आनंदाची बातमी ऐकण्यास उत्सुक असते. आणि तीच गोष्ट आपण भारतात सामान्यतः पाहतो. परंतु असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्नाआधीच गर्भधारणा केली आहे आणि कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाआधी त्यांनी गर्भधारणा केल्यानंतर त्यांचे करियर नष्ट झाले होते आणि त्यांच्यावर खूप टीका देखील झाली होती. जरी जगाच्या काही भागात ही सामान्य गोष्ट असेल परंतु आपल्या देशात तरी लग्नानंतरच गर्भधारणा केली जाते.

बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या पण याबद्दल खूप लोकांना माहिती नव्हते म्हणजे एक प्रकारे त्यांची ही गोष्ट सिक्रेट होती. खाली दिलेल्या या अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या.

1. महिमा चौधरी
2. नेहा धुपिया
3. कोणकोना सेन शर्मा
4. सारिका
5. सेलेन जेटली
6. अमृता अरोरा
7. श्री देवी
यामध्ये अजून एका अभिनेत्रीचं नाव आता जोडल जाणार आहे आणि ती अभिनेत्री आहे कल्की कोचलीन. कल्की ने लग्नाआधीच हॉट बेबीबंप फोटोशूट केले आहे. आणि तशे त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे.

कल्किने स्वतःहा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत ती गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर तिने वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देण्याचा प्लॅन केला असल्याचे देखील सांगितले होते. केलेल्या फोटोशूट मध्ये कल्किचा बेबीबंप दिसत आहे. कल्कि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी आहे. पण तिने अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर ती बराच काळ सिंगल होती.

काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा होती. मात्र आता कल्कि लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तिने ही गोष्ट न लपवता स्वतः तशी पोस्ट शेअर केली आहे.
