जयाचे फक्त हे एक वाक्य ऐकून अमिताभ च्या जीवनातून दूर झाली रेखा, आजही अमिताभचे नजरेला नजर भिडवत नाही…

बॉलिवूड मध्ये नेहमीच जबरदस्त भावनात्मक, नाटकीय फिल्मी कहाण्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा कहान्या देखील पडद्यावर चांगल्याच लोकांच्या पसंतीला उतरल्या आहे. अनेकदा चित्रीकरण करूनही या कथा बॉलिवूड स्टार्सची वैकतिक जीवनातील खरी कहाणी काय आणि कधी असेल याचे बाबत जाणून घेण्यास देखील लोक उस्तुक असतात. प्रेक्षक या गोष्टीबद्द्ल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात.
अशा भावनात्मक कहाण्या आणि नाटकांनी भरलेली खरी कहाणी म्हणजे जया-अमिताभ आणि रेखा यांचा हा कौटुंबिक तिढा कधीही सोडवता न येण्यासारखा आहे. ही कहाणी अशी आहे की आजही लोक ऐकण्यासाठी कान टवकारून सावध असतात.आज आम्ही या कथेशी संबंधित आणखी एक कथा सांगणार आहोत.
रेखाच्या भागांतील कुंकू :-
हे कोणापासून लपलेले नाही की जयाशी लग्नानंतरही अमिताभ रेखाच्या अगदी जवळचे सबंध बनुन राहिलेत आणि यामुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर खूप परिणाम झाला. 1977 च्या सुमारास त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी बरीच चर्चा झाली होती. त्या दिवसांत अशीही बातमी आली होती की रेखा आई बनणार आहे.
या मुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तथापि रेखाने कुंकवाच्या मुद्यावर सांगितले होते की ती शूटिंग करत होती आणि घाईघाईने लग्नात पोहोचली होती, तथापि, हे सर्व जया बच्चन यांना धक्कादायक वाटले होते. जर आपण योग्य वेळी योग्य पाऊले उचलली नाहीत तर तीचे वैवाहिक जीवन उध्वस्त होईल हे तीला समजले होते.
एकदा शूटिंगच्या संदर्भात अमिताभ मुंबईबाहेर गेले होते आणि जया देखील याच दिवसाची वाट बघत होती. तेव्हा मोका साधून जयाने रेखाला फोन केला. रेखाने जेव्हा फोन उचलला तेव्हा तिला वाटले की जया तिला काहीतरी वेडेवाकडे बोलेल, पण असे काही झाले नाही.
जयाचे ते शब्द असे होते :-
जयाने रेखाशी फोन वर बोलून तीला जेवायला बोलावले होते. रेखाला असे वाटले की जया तिला घरी बोलवून तिचा अपमान करू इच्छिते. अखेर जीव मुठीत धरून रेखा जयाच्या घरी आली. तेव्हा जया साध्या कपड्यांमध्ये होती. दोघीही गोड गोड बोलू लागल्या, पण बोलताना एकदाही जयाने अमिताभचा उल्लेख केला नाही.
तीने रेखाला आपले घर दाखवले, बाग दाखविली. रेखा पण जायचे ऐकत होती आणि तिच्याशी बोलत होती, पण रेखा ला विश्वास बसेना की जया एकदाही अमिताभ बद्धल काहीच बोलली नाही.रात्रीचे जेवण करून मग रेखा म्हणाली की आता मी निघू काय. जया रेखाला दारापर्यंत सोडवायला आली आणि असे काहीतरी बोलली जे ऐकून रेखाला धक्का बसला.
जया रेखाला म्हणाली – काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही… रेखा हे वाक्य ऐकून अवाक झाली होती, पण नंतर ती तिच्या घरी गेली. दुसर्या दिवशी त्या दोघीसोबतचे जेवणाचे किस्से उघड झाले पण त्या दोघीनीही गप्प बसायचे ठरवले. आपले विवाहित जीवन उध्वस्त होणार की काय हे अमिताभला जानउ लागले होते, म्हणून अमिताभने रेखाला आपल्या आयुष्यातून दूर केले. त्या दिवसापासून रेखा जया आणि अमिताभ यांनी आजपर्यंत हे अंतर राखून आहे.