‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगनी’ खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस ! फोटो पाहून विश्वास बसणार नाही ..

सिनेमा हा आपल्या समाजाचे वास्तव असते, आहे असं समजलं जात. खूप कमी वेळा समाजाला आरसा दाखवला जाणारा वास्तवा’दी सिनेमा बनवला जातो. असे सिनेमा कमर्शियल नसतात, त्यामुळे मोठाले आणि दिग्ग्ज कलाकार खूप कमी वेळा असे सिनेमा बनवण्यामध्ये इंटरेस्ट घेतात. असे सिनेमा बनवण्यामध्ये थोडी रिस्क असते, कारण त्यासाठी कथानक उत्कृष्ट हवे.
त्याचबरोबर, दिग्दर्शन आणि त्याला अनुरूप अभिनय देखील करता यायला हवा. पण ‘जय भीम’ या सिनेमाच्या बाबतीत सर्वच बाबी व्यवस्थित जुळवून आल्या. तामिळ सिनेमातील सिंघम स्टार, सूर्याने जेव्हा त्या कथानक ऐकले तेव्हा केवळ या सिनेमामध्ये अभिन्यासाठीच होकार नाही दिला तर सोबतच त्याच्या निर्मितीसाठी देखील पुढाकार घेतला.
आणि आपण सर्वच बघत आहोत, जय भीम या सिनेमाने केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात एकच चर्चा रंगवली आहे. जगभरातून या सिनेमाचे कौतुक करण्यात येत आहे. सिनेमाचे कथानक आणि अभिनय यामुळे हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. आयएमडीबी रेटिंग्सचा बाबतीत जय भीम सिनेमाने जगातील अनेक उत्तम सिनेमाना माघे टाकले आहे.
म्हणून जगभरातूनन या सिनेमाचे आणि यामधील कलाकारांचे देखील कौतुक होत आहे. हा सिनेमा बघताना अनेकवेळा अश्रू अनावर होतात. जगभरात सगळीकडे देशाचे नाव इतर गोष्टींमध्ये उंचावत असताना, त्याच देशातील गरिबांचे होणारे हाल हे भ’यान’क वास्तव आपल्या समाजाचे खरे रूप दाखवत आहे. रोमांच, थरार आणि भावनांनी भरपूर अशा या सिनेमाने वास्तवा’दी सत्य मांडत एक चपराक दिली आहे.
अभिनेता सूर्याच्या अभिनयाला खरोखरच काही तोड नाही. सध्याच्या काळातील एक सर्वोत्तम अभिनेता म्हणून सूर्याने पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र, त्याचबरोबर या सिनेमा नंतर एक नाव सातत्याने घेतले जात आहे. सेंगनीच्या नावाची देखील सध्या जोरदार च’र्चा होत आहे. आपल्या नवऱ्यासाठी न्यायाची अपेक्षा ठेवणारी एक अशिक्षित महिला, परिस्थतीमुळे अत्यंत हतबल होते.
एक सहा-सात वर्षांची मुलगी आणि पोटात बाळ, या स्थितीमध्ये आदिवासी खेड्यातून कोर्टापर्यंतचा तिचा लढा असाधारण होता. हे पात्र, अभिनेत्री लिजोमोल जोसने रेखाटले आहे. लिजोमोलने मल्याळी सिनेमातून आपल्या करियरची सुरुवात केली. महेशान्त प्रतिकारम या मल्याळी सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
मल्याळी इंडस्ट्रीमध्ये नाव कमवल्यानंतर, तिने आपला मोर्चा तामिळ इंडस्ट्रीकडे वळवला. शिवप्पू मंजल पिचाई या सिनेमामधून तिने तामिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिच्या अभिनयाचे सुरुवातीपासूनच चांगलेच कौतुक होत होते. त्यामुळे तिला सूर्या सोबत जय भीम सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
जय भीम सिनेमामध्ये, आदिवासी महिलेच्या भूमिकेत झळकलेले लिजोमोल खऱ्या आयुष्यात अत्यंत ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिने अरुण अँटोनी ओनिस्सेरील सोबत लग्न केले आहे. जय भीम सिनेमामुळे तिला जगभरात एक नवीन ओळख मिळाली.