जेव्हा इरफ़ान खान AC रिपेअर करायला राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर गेला, आणि

काही कलाकार, आपल्या कलेने आणि आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करतात. ह्या कलाकारांचा अभिनय आणि त्यांची न मिटणारी छापच आपल्या सर्वांच्या लक्षात राहते. मात्र, त्या ठिकाणी ती जागा मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपल्यापैकी अनेकांना ठाऊक देखील नसतो.

तुमच्यात धैर्य आणि कला व सोबतीला मेहनत घेण्याची तैयारी असेल तर, बॉलिवूड मध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. असे अनेक उदाहरण, अश्या अनेक यशोगाथा आपण कित्येक कलाकारांच्या पहिल्या आहेत. इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सु’शांत सिं’ह रा’जपूत, कार्तिक आर्यन, दिव्या दत्ता, तापसी पन्नू, स्वरा भास्कर हि काही अशी नावं आहेत ज्यांनी कोणत्याही बॅकग्राउंड शिवाय बॉलिवूड मध्ये नुसता प्रवेशच नाही केला तर आपला वेगळा असा चाहत्यांचा वर्ग निर्माण केला. ह्यापैकी, इरफान खान आणि सुशांत आपल्यासोबत नाहीयेत मात्र, त्यांचे काम नेहमीच त्यांच्या असण्याचा अनुभव आपल्याला देत राहतात.

इरफान खान, ह्यांचा प्रत्येक सिनेमा आणि त्या सिनेमामधील त्यांचे काम आजही खूपच कौतुकास्पद आहे. त्यांचा प्रवास हा खूप खडतर आणि संघर्षमयी राहिलेला आहे. एके काली ज्युरासिक पार्क चा सिनेमा बघायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, आणि त्याच सिनेमाच्या अखेरच्या भागात एक प्रमुख पात्राची भूमिका त्यांनी निभावली.. त्यांच्या ह्या प्रवासात अनेक छोट्या छोट्या कथा लपलेल्या आहेत..

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना देखील आणि आज या जगात नाहीत. राजेश खन्ना हे २० व्या शतकातील सुपरस्टार होते तर इरफान खान २१ व्या शतकातील एक मोठा स्टार मानला जायचा.

दोन्ही कलाकारांशी संबंधित एक किस्सा सांगणार आहे जो खूपच मनोरंजक आहे. इतरांप्रमाणे इरफान खान हे देखील सुपरस्टार राजेश खन्ना यांचे खूप मोठे चाहते होते. फार थोड्या लोकांना हे माहिती आहे. अभिनेता होण्यापूर्वी इरफान खान राजेश खन्ना यांना भेटण्यासाठी, बहाण्याने बंगल्यात एसी रिपेअर करायला गेला होता.

इरफान खानने एका मुलाखतीत स्वत: हून हे सांगितलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, अभिनेता होण्यापूर्वी ते मुंबईत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचे, या काळात ते मुंबईत राहण्यासाठी एसी दुरुस्तीचं काम करायचे. अशा परिस्थितीत मेकॅनिक म्हणून त्यांनी राजेश खन्ना यांच्या घरच्या एसीच सर्विसींगचं काम मिळविलं.

पुढे ते सांगतात की, ”मला चांगलं आठवतं जेव्हा मी राजेश खन्ना साहेबांच्या बंगल्यामध्ये पोहोचलो तेव्हा त्यांच्या नोकराने दार उघडलं. थोडा वेळ मी त्यांच घर पहातच राहिलो. मी इतका अप्रतिम बांगला पहिल्यांदाच पाहिला होता. यावेळी मी बंगल्यात सगळीकडे राजेश खन्ना साहेबांना शोधण्याचा प्रयत्न करीत होतो, कदाचित त्या दिवशी माझं नशीब वाईट होतं कारण त्या दिवशी ते घरीच नव्हते”.

या मुलाखतीदरम्यान इरफान खानने राजेश खन्ना यांच्या बद्दल देखील बर्‍याच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये जे स्टारडम मिळवलं ते पुन्हा कधीचं कुणाच्याच नशीबात आलं नाही. ते इंडस्ट्रीमधील पहिले आणि सर्वात मोठे सुपरस्टार होते. आणि ते नेहमीच त्या सिंहासनावर विराजमान राहतील.

आज जरी बॉलिवूडच्या या दोन दिग्गज कलाकारांनी या जगाला निरोप दिला असला, तरी त्यांच्या अभिनय आणि डायलॉगने ते नेहमी चाहत्यांच्या हृदयात जिवं’त राहतील.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.