तब्बल 35 वेळा अपयशी झालेनंतर IPS विजय वर्धन यांनी लिहिली यशाची अशी नवी कहानी….

आयपीएस विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी. 35 वेळेस च्या अपयशानंतर आयपीएस विजय वर्धन यांनी यशाची नवी कहाणी लिहिली आहे:
एक विधान आहे की कदाचित तुम्हीही ऐकले असावे की बऱ्याच अपयशानंतर यश पदरी पडते. ही उक्ती बर्याच ठिकाणी खरी ठरली आहे आणि ती आपण सभोवताली पाहिली पण गेली आहे, परंतु एकदा किंवा दोनदा किंवा तीन ते चार, चार ते पाच… यापेक्षा जास्त अपयश आपण पाहिलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची माहिती सांगणार आहोत , की जो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 35 वेळा अयशस्वी झाला परंतु त्या नंतर एक दिवस यश हाती पडून ती व्यक्ती आयपीएस बनली.
होय, होय आम्ही आयपीएस विजय वर्धनबद्दल बोलत आहोत. असेच वर उल्लेख केल्याप्रमाणे काहीसे आयपीएस विजय वर्धन यांच्या बाबतीत घडले आहे. यूपीएससी परीक्षेची कठींनता जाणून घेतली तर आपल्या लक्षात येईल की अनेक प्रयत्न करूनही परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होणे सहजासहजी श्यक्य नसते, परंतु तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की आयपीएस विजय वर्धन या परीक्षेत कमीतकमी 35 वेळा नापास झाले आहेत आणि ते 36 व्या वेळेस पास होऊन यशस्वी झालेले आहे.
आयपीएस विजय वर्धन हे हरियाणाचे रहिवाशी आहे.
आयपीएस विजय वर्धन हे हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील आहे. विजय वर्धन यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले होते. यानंतर विजय वर्धन उच्च शिक्षण करून अभ्यासासाठी हिसारला गेले. येथून त्यांनी 2013 मध्ये इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, विजय वर्धन यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग केली आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते दिल्लीत गेले आणि तेथूनच त्यांनी यूपीएससी परीक्षेचे कोचिंग करून घेतले.
येथून त्यांची सिव्हिल सर्व्हिस सुरू झाली परंतु विजय वर्धन यांचे संपूर्ण लक्ष फक्त यूपीएससी परीक्षेवर होते, मग ते आणखी काय करतील. याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014-15 मध्ये विजयल वर्धन यांनी फक्त यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश आले, परंतु मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजय वर्धन यांनी आपल्या तयारीवर थोडे अधिक लक्ष केंद्रित केले आणि अंतिम फेरीदेखील पास केली, परंतु केवळ 06 गुणांनी मुख्य परीक्षेच्या यादीमधून नाव गमावले. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही विजय वर्धन यांचा हेतू बदलला नाही किंवा ते आपल्या ध्येयाच्या मार्गापासून दूर गेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यावेळी ते मुलाखतीपर्यंत पोहोचले, परंतु यश अद्याप त्याच्यापासून फार दूर होते. बर्याच वेळा अपयशी ठरल्यानंतरही विजयचे धाडस मोडलेले नाही आणि त्यापेक्षाही धैर्य वाखाणण्याजोगे होते.
यूपीएससी परीक्षेला बसणारे बहुतेक उमेदवारांचे मत आहे की ही परीक्षा देताना दुसरा जॉब पर्यायही तयार ठेवावा, कारण या परीक्षेत यशस्वी होणे खूप अवघड मानले जाते, तर ते इतर पर्यायांवरही लक्ष ठेऊ शकतात. विजय यांनी यूपीएससी व्यतिरिक्त ए आणि बी दर्जाच्या 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. उदाहरणार्थ, हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल इत्यादी आणि त्यांची निवड कुठेही झाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यामुळे विजय वर्धन नक्कीच विचलित झाले होते पण हताश मात्र झाले नव्हते.
पाचव्या प्रयत्नास सर्वांनी त्यांना नकार दिला होता :
विजय वर्धन अनेक वेळा अयशस्वी झाले तेव्हा विजय वर्धन यांनी नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांनीच धैर्य गमावले होते. सर्वांनी पाचव्यांदा प्रयत्न करण्यास विजय यांना नकार दिला, पण विजय वर्धन कुणाचे ऐकन्याचे मनस्थितीत कोठे होते? ते सर्वांना असे बोलले की होते त्यांच्या तयारीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या यशाचा आत्मविश्वास. विजय वर्धन यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी त्यांनी ती परीक्षा 104 रँकसह उत्तीर्ण झाले. अश्या प्रकारे वेळोवेळी सर्व परिश्रमातून अपयशाला पायदळी तुडवून अखेरीस वर्ष 2018 मध्ये विजय वर्धन यांना त्याचे गंतव्यस्थान प्राप्त झाले आणि आयपीएस होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांना यश आले. विजय वर्धन हे अपयशी परीक्षार्थीना एक दिलासा देणारे एक उत्तम उदाहरण म्हणून मानता येईल. परंतु बऱ्याच वेळा लोक अपयशाला उराशी कवटाळून हार मानतात.