फरहान अख्तरनंतर हृतिक रोशनही करणार दुसरं लग्न!, लवकरच 16 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ?

हृतिक रोशन हे बॉलीवूड मधील एक मोठं नाव आहे. २२ वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है,’ या सिनेमातून त्याने बॉलीवूड मध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सिनेमात त्याने भरगोस यश आणि लोकप्रियता कमवली. पहिल्याच सिनेमाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. एक सुपरस्टार म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले. धूम, कभी ख़ुशी कभी गम, जोधा अकबर, अग्निपथ, जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाने त्याने अनेकांना वे’ड लावले. ‘क्रिश’ च्या रूपात हृतिकनेच बॉलीवूडला पहिला सुपरहिरो दिला. मात्र आपल्या प्रोफेशन लाईफमध्ये हृतिक जितका यशस्वी ठरला.
तेवढाच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वा’दात देखील राहिला. आपल्या पहिल्याच सिनेमाच्या यशानंतर हृतिकने आपली लॉन्ग टाईम ग’र्लफ्रेंड सुजैन सोबत लग्न केले. यादें सिनेमाच्या वेळी करीना कपूर सोबत हृतिकच्या अ’फे-अरच्या च’र्चाना उधाण आले होते. त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले.
असं सांगितलं जात होत की, काईट्स सिनेमाची अभिनेत्री बार्बरा मोरीवर हृतिकचे चांगलेच प्रेम जडले होते. आणि त्याच्या नात्याच्या बातम्या ऐकून सुजैनने घर देखील सोडले होते. त्यातच अभिनेत्री कंगना रानौत देखील त्याच्यासोबत नात्यामध्ये असल्याचा दावा केला. आणि २०१४मध्ये सुजैन आणि हृतिक दोघांचा घ’टस्फो’ट झाला. सुजैन आणि हृतिक वेगळे झाले असले तरीही, अनेकवेळा त्यांना सोबत बघितले जात होते.
म्हणून ते दोघे पुन्हा एकत्र येणार का अशा च’र्चा सुरु होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी ह्रतिक रोशनच्या एका फोटोमुळे वेगळीच चर्चा रंगली होती. झालं असं की, ह्रतिक एका रेस्टोरंटमध्ये डिनर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक त रुणी दिसत होती. तिच्या हातात हात घा’लून हृतिकने रेस्टोरंटमध्ये प्रवेश केला होता.
मात्र त्यावेळी त्या तरुणीच्या चेहऱ्यावर मास्क होता त्यामुळे ती नक्की कोण आहे हे, असा प्रश्न सर्वाना पडला होता. हि तरुणी अजून कोणी नसून अभिनेत्री आणि म्युझिशियन ‘सबा आझाद’ आहे, असं मीडिया रिपोर्ट्सने माहिती दिली आहे. सबा आझाद ही केवळ एक अभिनेत्रीच नाही थियेटर डिरेक्टर आणि म्युझिशियन देखील आहे. ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ आणि ‘दिल कबड्डी’ सारख्या चित्रपटात सबा आझादने काम केले आहे.
ह्रतिक अनेकवेळा अभिनेत्री सबा आझाद सोबत स्पॉट झाला होता, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, बातम्या येत आहेत की हृतिक रोशन या नात्याबद्दल खूप सीरियस आणि त्याला लवकरात लवकर सबासोबत लग्न करायचे आहे.
हृतिक रोशन आणि सबा आझाद हळूहळू त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, हृतिक लवकरच सबासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. एका सूत्राने सांगितले की, हृतिक त्याच्या सबासोबतच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि त्याला हे नाते पुढे नेण्याची इच्छा आहे.
तो लग्न करण्याचा विचार करत आहे. अद्याप काहीही ठरलेले नसले तरी दोघेही खूप आनंदी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक सबासोबत लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे.. त्याला हे नातं मीडियापासून दूर ठेवायचे आहे. ह्रतिक फरहान अख्तर आणि शिबानी अख्तर प्रमाणेच लग्न करण्याच्या विचारात आहे.