जर शूटिंग दरम्यान ही एक चूक केली नसती तर अभिषेक च्या नावाचं कुंकू लावून बच्चन कुटुंबाची सून म्हणून मिरवत असती ही अभिनेत्री.

बॉलीवुड मध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा दाखवणारे बरेच अभिनेते अभिनेत्री आजपर्यंत होऊन गेलेत. त्यापकी काही अभिनेते स्वतःच्या हिमतीवर आणि कलाकृतीतून नाव प्रसिद्धीस आणु शकले तर काही अभिनेत्यांना प्रसिध्दी मिळाली ती घरातील वारसा हक्काने.
बॉलीवुड मध्ये असे पण काही अभिनेते आणि अभिनेत्री आहे की ज्यांचे आईवडील प्रसिद्ध सितारे आहेत परंतु इतका सगळा पाठिंबा असून देखील त्यांचे नाव प्रसिद्धीच्या सर्वात खालच्या जागी जाऊन पोहचले आहे.
अभिषेक बच्चन यांना अमिताभ बच्चन यांचे नावाचा आणि कीर्तीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. असे असूनही अभिषेक बच्चन आतापर्यंत प्रत्येक प्रकरणात पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. जया बच्चन यांचे देखील नाव प्रसिद्धीस पात्र असे आहे. लोक असेही म्हणतात की जयाला तिच्या मुलाचा देखील बॉलीवुड मधील दबदबा टिकवायचा आहे.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी देखील अभिषेक ला प्रसिद्धीस नेण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केलेले आहेत. हे सर्व करताना अभिषेक वर त्यांची करडी नजर देखील असायची. पण अभिषेक आणि राणी मुखर्जीच्या प्रणयच्या बाबतीत हे सत्य सिद्ध झालं आहे की जया बच्चन तीच्या मुलावर किती नियंत्रण ठेवते.
मणिरत्नमच्या ‘युवा’ या चित्रपटा नंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक चर्चेची जोडी बनली होती. दोघांच्या या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने त्यांचे वैयक्तिक जीवनातही बरेच रंग बहरून आले होते, दोघांचाही एकमेकांवर जीव जडला होता, जीव इतका जडला होता की ही बाब लग्नाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती.
बिग बी यांनाही या नात्यावर अजिबात आक्षेप नव्हता आणि जया बच्चनही राणी बंगाली असल्याने हे नातं स्वीकारण्यास तयार होती. पण जया बच्चन यांच्यासह अभिषेक आणि राणीला “लागा चुनरी में डाग” या चित्रपटात कास्ट केले गेले तेव्हा या प्रकरणाला नवीन वळण लागले.
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यात एका गोष्टीवरून तणाव वाढला होता. हा तणाव इतका वाढला की दोघींमधील संवाद देखील थांबून एकमेकींशी बोलायच्या थांबल्या होत्या आणि दोघींनीही चित्रपटाचे शूटिंग संपेपर्यंत एकमेकिंपासून लांबचे अंतर ठेवले.
शूटिंग दरम्यान या दोघिंच्या तणावामुळे अभिषेक आणि राणीच्या परस्पर संबंधांचे नशिबही निश्चित झाले. असं म्हणतात की जेव्हा राणीच्या कुटूंबाने जयाशी असलेला नातेबंध पुढे नेण्याची विनंती केली तेव्हा तिने राणीबद्दल अशा काही टिप्पण्या केल्या ज्यामुळे राणीला खूप राग आला आणि तिने मौन पाळले.
यामुळे संतप्त झालेल्या राणीने अप्रत्यक्षपणे जया बच्चनवर एका मुलाखतीच्या वेळी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जया यांनी अभिषेकला राणीपासून दूर राहण्याची सूचना केली. अभिषेकनेही आज्ञाधारक मुलाप्रमाणे राणीपासून लांब राहू लागला.
या संपूर्ण प्रकरणात अमिताभ बच्चन एक बघ्याची भूमिका करत राहिले. अशाप्रकारे ‘लागा चुनरी मे डाग’ ने रोमान्स पेटवून दिला. या चित्रपटा नंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.