‘प्यार किया तो डरना क्या’ मधील अरबाज खानची प्रेयसी आठवते का? आहे साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी..

‘प्यार किया तो डरना क्या’ मधील अरबाज खानची प्रेयसी आठवते का? आहे साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी..

काही वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये आलेला ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. या चित्रपटांमध्ये प्रचंड अँक्शन, मारधाड, रोमँटिक गाणी असे सर्व काही होते. या चित्रपटामध्ये सलमान खान याची मुख्य भूमिका होती. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये काजोल ही दिसली होती.

तर या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांची देखील भूमिका होती. तसेच अरबाज खान याने देखील या चित्रपटात भूमिका केली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटात सलमान खान याचे ओ ओ जाने जाना, हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यामध्ये त्याने कुठलाही शर्ट घातला नव्हता. त्यामुळे त्याच्या सारखी शरीर यष्टी बनवण्याची स्पर्धा अनेकांनी लावली होती.

हे गाणे कमाल खान याने गायली होती. त्यानंतर कमाल खान याला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील मिळू लागल्या होत्या. या चित्रपटाला जतीन-ललित, हिमेश रेशमिया, साजिद-वाजिद यांच्यासह काही संगीतकारांनी संगीत दिले होते. त्यामुळे हा चित्रपट माइलस्टोन ठरला होता. त्यानंतर काजोल हिला देखील अनेक चित्रपट ऑफर मिळाल्या होत्या.

त्यानंतर सलमान खान आणि काजोल यांनी एकत्र काम केल्याचे फार चित्रपट नाहीत. कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अरबाज खान याने खूप चांगली भूमिका केली होती. हा चित्रपट सलमान खानचा भाऊ सोहेल खान याने दिग्दर्शित केला होता.

त्याचा हा पहिलावहिला चित्रपट होता. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर देखील त्याने अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तसेच त्याने काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटामध्ये अरबाज खान याच्यावर गाणे चित्रित करण्यात आले होते.

‘तेरी जवानी बडी मस्त मस्त है’ असे या गाण्याचे बोल होते. हे गाणे देखील प्रचंड गाजले होते. या चित्रपटामध्ये अरबाज खान याच्या प्रेयसीचा रोल अंजली झवेरी या अभिनेत्रींनी केला होता. हा चित्रपट केल्यानंतर अंजली हिला काही चित्रपटात काम मिळाले. मात्र, तिला खूप मोठी अशी भूमिका मिळाली नाही.

त्यामुळे तिने दाक्षिणात्य चित्रपटात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटात थोडे यश मिळाले. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिला काही जणांनी या निर्णयापासून रोखून धरले होते. त्यानंतर तिने काही चित्रपटात काम केले.

आपल्याला करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा आलेला जब वी मेट हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये अंशुमन हे पात्र आपल्याला चांगलेच आठवत असेल. अंशुमन हे पात्र खूप गाजले होते. अंशुमन याचे खरे नाव तरुण अरोरा असे आहे. काही वर्षांपूर्वी तरुण अरोरा आणि अंजली झवेरी यांनी लग्न केले आहे. दोघेही आता सुखी संसार करत असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12