अबब! एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक आहे गोविंदा ! काम नसतानाही, यातून कमवतो अरबो रुपये; मुंबईतच आहेत ३ बंगले, २फ्लॅट आणि…

बॉलीवूडमध्ये एकदा कोण्या कलाकाराच्या नावाचं नाणं चाललं की, यश-कीर्ती त्याची होणारचं याबद्दल काहीच वाद नाही. मात्र त्यासाठी त्या कलाकरांना चांगलीच मेहनत घ्यावी लागते, आणि त्यात जर या इंडस्ट्री मध्ये तुमचा कोणी गॉडफादर नसेल तर ती मेहनत दुप्पटीने वाढते. मात्र टॅलेंट असेल तर, बॉलीवूडमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळते.

असे अनेक उदाहरण सुरुवातीपासूनच बघायला मिळाले आहेत. त्यापैकी खूप कमी नावं आहेत, ज्यांनी प्रमुख कलाकार म्हणून भूमिका रंगवल्या. अलीकडच्या काळातील, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुशांत सिंग, पंकज त्रिपाठी, तापसी पन्नू, स्वरा भास्कर ही अशी काही नावं आहेत ज्यांनी कोणताही बॅकग्राऊंड सपोर्ट नसताना बॉलीवूड मध्ये केवळ पदार्पणच नाही केलं तर यश देखील कमवले.

मात्र ९०च्या दशकात देखील एका कलाकाराने अशीच कीर्ती कमावली. या कलाकाराने केवळ कीर्तीच नाही कमवली तर त्याने लोकप्रियता आणि यशाची अनेक शिखरं गाठली, तो कलाकार म्हणजेच ‘गोविंदा’. १९८६ मध्ये ‘इल्जाम’ सिनेमामधून गोविंदाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक सिनेमामधून छोटाले रोल्स केले.

मात्र हळूहळू त्याचा जबरदस्त अभिनय आणि भन्नाट डान्स यामुळे लाखो चाहते निर्माण झाले आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमांची अक्षरशः रांगच लागली. राजा बाबू, हिरो नं १, कुली नं १, आंटी नं १, दुल्हे राजा, दिवाना मस्ताना, साजन चले ससुराल, बडे मियां छोटे मियाँ, हसीना मान जायेगी, पार्टनर अश्या सिनेमांनी त्यांनी पररक्षकांचे भरगोस मनोरंजन केले.

त्यामुळे सतत यश त्यांना मिळत गेलं आणि लोकप्रियता वाढतच गेली. एके काली संघर्षमयी जीवन जगणारे गोविंदा आता मात्र खूपच लग्‍जरी लाइफ जगत आहेत. त्यांनी भरपूर प्रॉपर्टी कमवली आहे. सध्या त्यांच्याकडे फारसे काम नसले तरीही, त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट मधून त्यांचे आजही करोडो रुपयांचे उत्त्पन्न सुरूच आहे.

एका वाहिनीने दिलेल्या माहिती नुसार, त्यांच्याकडे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात ३ भले-मोठे बंगले आहेत. जुहू सारख्या भागात त्यांचा एक मोठा बांगला आहे आणि त्यांचे कुटुंब आणि ते याच बंगल्यात राहतात. शिवाय मंद आइलैंड भागात देखील त्यांचा एक बांगला आहे. त्याचबरोबर रियल इस्टेट म्हणजेच जमिनीमध्ये त्यांनी आपे करोडो रुपये गुंतवून ठेवले आहेत.

शिवाय इतर अनेक क्षेत्रात त्यांनी आपले पैसे गुंतवले आहेत, ज्यामधून त्यांना प्रत्येक महिन्याला करोडो रुपयांचा नफा होतो. सांगितल जात की त्यांच्या कडे, महागड्या ५-६ गाड्या आहेत. त्यांची मुलगी टीना अहुजाच्या नावे त्यांनी मुंबईमधील काही महागड्या भागात २ फ्लॅट घेतले आहेत. एकूणच त्यांच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचा खरा आकडा समजला नसला तरीही, १००० कोटींच्या आसपास त्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल, असे त्या वाहिनीने सांगितले आहे.

ब्रॉन्ड इंडोर्समेंट आणि रियल स्‍टेट प्रॉपर्टी इनवेस्‍टमेंट मधून गोविंदा यांची तब्ब्ल १५-३० कोटींची कमाई होते. सध्या गोविंदाकडे बॉलीवूडमध्ये मोठं काम नसलं तरीही काही छोटया-मोठ्या रोल्स मध्ये ते अधून-मधुन झळकतच असतात. तूर्तास कोणत्या मोठ्या सिनेमामधून ते पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12