रेखाचे या विचित्र वागण्यामुळे अमीर खान यांनी रेखासोबत एकाही चित्रपटात केले नाही काम, हे होते कारण…

रेखाचे या विचित्र वागण्यामुळे अमीर खान यांनी रेखासोबत एकाही चित्रपटात केले नाही काम, हे होते कारण…

बॉलीवुड की सदाबहार एक्ट्रेस म्हणून ओळखली जाणारी रेखा जिने तिच्या काळामध्ये चित्रपट सृष्टी खूपच गाजवली होती. चाहते देखील रेखाला तितकाच प्रतिसाद देत होते. अमिताभ पासून जितेंद्र, धर्मेंद्र पर्यंत च्या सर्व कलाकारांचे बरोबर काम करणाऱ्या रेखाच्या जीवनात अनेक वाईट प्रसंग नेहमीच घडले आहेत. रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहात असते. काही काळापूर्वी तर रेखावर सतत काही ना काही चर्चा होत असे. त्या काळात देखील रेखाला सुरुवातीचे काही दिवस बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे अमीर खान बॉलीवूड मधील असे एक नाव आहे ज्यांनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये खूपच यश मिळवले आहे. आमिर खान खूपच परफेक्ट असा चित्रपटच निवडतात त्यामुळे त्यांना प्रत्येक चित्रपटात यश मिळतेच त्यामुळे त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट असे देखील म्हटले जाते. वर्षभरातून आमिर खान केवळ मोजकेच चित्रपट करतात परंतु त्यांचे चित्रपट लोकप्रिय देखील ठरतात.

रेखा आणि अमीर खान यांनी कधीही एकमेकांसोबत काम केले नाही. दोघेही एकमेकांना खूपदा भेटत असतात, बोलत असतात आणि एकमेकांचा खूपच आदर देखील करतात. परंतु एकाही चित्रपटात दोघांनी सोबत काम केले नाही. आज आम्ही या लेखातून तुम्हाला यामागील कारण सांगणार आहोत. का रेखा आणि आमिर खान एकमेकांसोबत चित्रपट करत नाही?

असे सांगितले जाते की आमीर खान यांनी तेव्हापासून रेखा सोबत काम करायचे नाही असे ठरवले होते जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली होती. 1980 मध्ये आलेले चित्रपट लॉकेटमध्ये रेखा यांनी काम केले होते. आमिर खान यांचे पिता ताहीर हुसेन यांच्या निदर्शनात बनलेला हा चित्रपट होता. वडिलांच्या चित्रपट सेटवर आमिर खान देखील जात होते तेव्हापासूनच आमिर खान यांनी सुरुवातीपासूनच रेखा यांना अगदी जवळून पाहिले आहे.

रेखा यांनी चित्रपट शूटिंग सुरू असताना बरेचसे शूट कॅन्सल केले आणि वेळेची खूपच नासाडी देखील केली. चित्रपटाची री शूटिंग सुद्धा अनेकदा झाली. अगदी कठोर परिश्रमानंतर हा चित्रपट शूटिंग करून पूर्ण झाला. या चित्रपट पूर्ण करण्यासाठी अमीर यांच्या वडिलांना खूपच संघर्ष करावा लागला होता आणि हे आमीरने खूपच जवळून पाहिले होते.

रेखाने तेव्हा केलेले हे काम आमिरला अजिबात आवडले नाही. वेळेचे महत्व आमीरला खूपच आहे. आमिर खान आपल्या चित्रपट निवडताना त्यामध्ये कशाप्रकारे आपले पात्र आहे, कशा प्रकारे आपले संवाद आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करत आहे. आपल्याबरोबर कोण कोणते कलाकार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करतात. रेखाच्या या कारणामुळे आमिर खान यांनी कधीही रेखा बरोबर काम केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12