माझ्या नवऱ्याची बायको : राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची तयारी पाहिली का ?

डिसेंबर हा महिना लग्नसोहळ्याचा महिना असतो. यामध्ये मराठी मालिकाही मागे नाहीत. झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये आता लग्नकार्य पार पडणार आहे आणि हे लग्न शनया आणि गॅरीची नाही तर राधिका आणि सौमित्र होणार आहे. सौमित्र आणि राधिका लग्नबंधनात अडकणार आहे, आणि तशी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे.

येत्या 23 24 आणि 25 डिसेंबरला राधिका आणि सौमित्र यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि त्याची तयारी जोरदार सुरू असल्याचं दिसून येत आहे. झी मराठीने त्या दोघांच्या लग्नाची पत्रिका झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे, आणि त्यात त्यांनी असा कॅपशन दिले आहे की, ‘कारण द्यायचं नाही सोमवारपासून राधिका आणि सौमित्रच्या आनंदात सहभागी व्हायचं नक्की यायचं’.

lokmat.com

या लग्नाची सर्व तयारी जवळपास झालेली आहे हळद संगीत आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार असून झी मराठीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून याचा ट्रेलर शेअर केला आहे. शिवाय लग्नाची तयारी आधीपासूनच करण्यात आली आहे आणि साड्यांची खरेदी त्याचबरोबर लग्नाची खरेदी सुरू आहे. ट्रेलर पाहिल्यावर असे दिसून येते की तीन दिवसाचे एपिसोड जबरदस्त असणार आहे. राधिका बरोबरचे सर्व मंडळी जबरदस्त उत्साही दिसत आहेत. आता सौमित्र आणि राधिकाच लग्न होणार म्हणजे लग्नाच्या दिवशी शनाया आणि गॅरीची रिएक्शन काय असणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला 24 25 आणि 26 डिसेंबरचा एपिसोड पाहावा लागेलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12