‘या’ 9 गोष्टी प्रत्येक हिंदूला माहीत असायलाच हव्या, पहा 5 वी गोष्ट महत्त्वाची, प्रत्येकाला माहीत असायला हवी…

‘या’ 9 गोष्टी प्रत्येक हिंदूला माहीत असायलाच हव्या, पहा 5 वी गोष्ट महत्त्वाची, प्रत्येकाला माहीत असायला हवी…

तुम्ही जर स्वतःला एक हिंदू म्हणून घेत असाल तर तुम्ही या गोष्टी नेहमी पाळाव्या. या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करावे.

1) श्रीराम श्रीकृष्ण कधी इंग्लंड मधील ‘house of lord’ चे सदस्य राहिले आहेत का? नाही ना!
मग आपण इंग्लिश मधून नावे घेताना सुरुवातीला ‘Lord’ हा शब्द का वापरतो? जसे की Lord Rama, Lord Krishna सरळ सरळ कृष्णा, राम अशा एकेरी नावाने का नाही नावे घेत.

2) कोणाचाही मृ*त्यू झाल्यावर RIP म्हणू नका.

RIP या शब्दाचा अर्थ होतो ‘Rest in Peace’ हे दफन करणाऱ्यांसाठी म्हटले जाते. तुम्ही याऐवजी ‘आ*त्म्यास शांती लाभो’, ‘ओम शांती’, ‘मोक्षप्राप्ती होवो’ हे शब्द वापरू शकता.
आत्मा कधीही एका ठिकाणी आराम किंवा विश्राम करत नाही. आत्मा अमर असतो आत्म्याचा पुनर्जन्म होतो किंवा त्याला मोक्ष प्राप्ती होते.

3) आपल्या रामायण-महाभारत ला Mythological म्हणू नका रामायण-महाभारत हे ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी एक गौरवशाली इतिहास आहे.
राम कृष्ण हे आपल्यासाठी ऐतिहासिक देव आहे ते कुणी Mythological कलाकार नाहीये.

4) आपल्या मंदिरांना प्रार्थना गृह म्हणू नये.

मंदिरे हे देवालय असतात. देवाचे निवास गृह! ते प्रार्थना गृह नसते तिथे केवळ प्रार्थना होत नाही. अन्य पूजा पद्धतीमध्ये साप्ताहिक पूजा केली जाते परंतु हिंदू धर्मामध्ये पूजा ही नित्यनियमाने केली जाते.

5) वाढदिवस साजरा करायचा असल्यास आपण केक आणतो केकवर मेणबत्ती लावली जाते आणि आपल्या लहान मुलाला फुकवायला लावली जाते आणि फुकवल्यानंतर सर्वांनी ‘हॅपी बर्थडे’ म्हणून जल्लोष साजरा केला जातो.

पण जन्मदिवसाला दीप विझवुन त्या वेळेला अपशकुन बनवू नका. अग्नीचा मान ठेवायला विसरू नका. अग्नी देवासमोर आपल्या मुलांना प्रार्थना करायला सांगा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ (हे अग्नी देवा मला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी एक नवा मार्ग दाखव)

6) कृपया ‘spirituality’ आणि ‘materialistic’ या शब्दाचा वापर करणे टाळा.

हिंदूंसाठी संपूर्ण विश्व दिव्य तेजाने भरलेले आहे. ‘spirituality’ आणि ‘materialistic’ हे शब्द अनेक वर्षापासून युरोप वरून आले होते ज्यांनी चर्च आणि सत्तेमध्ये फरक केला. धर्म आणि विज्ञान यामध्ये फरक केला. आपल्या भारत वर्षामध्ये ऋषिमुनी हे पहिले वैज्ञानिक होते आणि येथे सनातन धर्म मूळ विज्ञानामध्ये आहे. यंत्र तंत्र आणि मंत्र हे आपल्या धर्मातील एक भाग आहे.

7) तुम्ही देवाला घाबरता का?

नाही ना! घाबरायला ही नाही पाहिजे का? कारण देव पृथ्वीवरील प्रत्येक कनाकनात बसलेला आहे. देव अजन्माकार, निराकार, परोपकारी, न्यायकारी आणि सर्वशक्तीमान आहे. एवढेच नाही तर आपल्या मध्ये सुद्धा एक देव बसलेला आहे. श्री संत गाडगे महाराज नेहमी म्हणत देव दगडात नसतो तर तो माणसात असतो.

8) हिंदू मध्ये लग्नाला सात फेऱ्या पूर्ण करून लग्न पार पाडण्यात येते. लग्न झाल्यानंतर पत्नीला नेहमी बायको म्हटले जाते. पत्नीला बायको कधीही म्हणू नये नेहमी धर्मपत्नी म्हणून संबोधावे.
जर तुम्ही तुमच्या पत्नीला जीवनसाथी मानत असाल तर तिला धर्मपत्नी असे म्हणावे.

9) ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जगामध्ये त्याचाच सन्मान होतो जो अगोदर स्वतःचा सन्मान करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12