जेव्हा दुर्योधनाने पत्नी भानुमती सोबत मित्र कर्णाला नको त्या अवस्थेत पकडले होते रंगेहाथ, पहाताच दुर्योधन कर्णाला म्हणाला तुझी…

महाभारतात दुर्योधन खलनायक म्हणून ओळखला जातो. तो हस्तिनापूर राजा धृतराष्ट्राचा थोरला मुलगा होता. त्याला खात्री होती की नंतर तो त्याच्या राज्याचा कार्यभार स्वीकारेल. पण त्यांच्या अनुचित धोरणामुळे पांडवांनी त्याचा हेतू यशस्वी होऊ दिला नाही. आज आम्ही तुम्हाला दुर्योधनाच्या जीवनाशी संबंधित असे एक किस्सा सांगणार आहोत. आजपर्यंत हा किस्सा आपण कधीही ऐकला नसेल.
असे म्हणतात की जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा महर्षि वेद व्यासांनी धृतराष्ट्राला दुर्योधनाचा वध करण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले की आपण असे केले नाही तर तुमचा मुलगा संपूर्ण कुटुंब नष्ट करेल. पण महर्षी व्यासांची ही गोष्ट किंवा सल्ला धृतराष्ट्राला योग्य वाटला नाही. याचा परिणाम महाभारताच्या युद्धाला झाला व महाभारत घडून आले.
अस म्हणतात की दुर्योधनने आपला मित्र कर्णावर आंधळेपणाने विश्वास ठेवत होता. कारण महाभारतात तो एकच माणूस होता. जक पांडवांच्या हातून दुर्योधनाला वाचवू शकला असता. एकदा कंबोजच्या राजा महाजनपाडाने आपली कन्या भानुमतीचा स्वयंवर आयोजित केला होता. ज्यामध्ये दुर्योधन यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला दुर्योधन जायला तयार नव्हता.
पण त्याला कळले की भानुमती कोणत्याही अप्सरापेक्षा दिसायला कमी नाही म्हणून तेव्हा त्याने तत्काळ जाण्यास तयारी दाखवली. त्यांनी स्वयंवरामध्ये जाऊन पाहिले की सर्वश्रेष्ठ भारतातील सर्व शक्तिशाली राजे व राजकन्या तेथे आले आहेत. त्यापैकी जरासंध, रुक्मी, शिशुपाल, कर्ण आणि दुर्योधन देखील होते. स्वयंवरच्या नियमांनुसार राजकन्येला स्वतःचा वर निवडायचा होता. परंतु असे म्हणतात की जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा भानुमती दुर्योधना जवळ गेली.
पण दुर्योधन यांना पुष्पहार घातला नव्हता. दुर्योधन हा अपमान सहन करू शकला नाही. त्याने कर्णाला हाताशी धरून भानुमतीशी लग्न केले आणि तीला हस्तिनापुरात नेले. दुर्योधन यांना आपल्या पत्नी भानुमतीवर खूप प्रेम होते. जेव्हा तो खेळावर जात असे तेव्हा तो भानुमतीला सोबत घेऊन जायचा. काही दिवसांत कर्ण आणि भानुमती यांचेही चांगले मैत्री झाली होती.
एकदा कर्ण त्याचा मित्र दुर्योधन याच्या अनुपस्थितीत भानुमतीच्या खोलीत गेला आणि चौसर खेळायला लागला. अचानक दुर्योधन तिथे आला. पायांचा आवाज ऐकून भानुमतीला समजले की दुर्योधन येत आहे. इतक्यात ती चौसर सोडून उभी राहिली. पराभवामुळे भानुमती उठल्याचे कर्णाला वाटले. त्याने भानुमतीचा हात धरला आणि पुन्हा तिला शेजारी बसवले. यामुळे कर्णाच्या हातातील जप माळ तुटली गेली होती. तेवढ्यात दुर्योधन त्याच्या समोर आला.
कर्ण आणि भानुमतीने विचार केला की आज दुर्योधन आपल्या दोघांवर संशय घेईल. पण त्याने तसे केले नाही. त्याने जगातील फक्त तीन लोकांवर विश्वास ठेवला. मामा शकुनी, सूतपुत्र कर्ण आणि त्याची सर्वात सुंदर पत्नी भानुमती. तो खोलीत आला आणि म्हणाला की मित्रा तुझी माळ सांभाळ आणि इतके बोलून दुर्योधन लगेच तेथून निघून गेला. काही कथांमध्ये असेही म्हटले आहे की कर्ण आणि भानुमती यांचे नाते पवित्र नव्हते.
पण याचा पुरावा महाभारतात मिळून आलेला नसल्याने याला नाकारता येउ शकते. दुर्योधनाचा हा विश्वास पाहून कर्ण भावनिक झाला आणि नंतर त्याने त्याच्या मित्राला विचारले की तुला माझ्यावर संशय का नाही ? तो म्हणाला की जगात तुच असा एक माणूस आहात ज्यावर मी आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतो. हे ऐकून कर्णाने वचन दिले की तो एक दिवस पांडवांविरूद्ध भयंकर युद्ध करेल. ज्याला संपूर्ण जग आठवणीत ठेवील.