दिव्या भारतीने जाता जाता या अभिनेत्रीला रातोरात बनविले होते सुपरस्टार, पहा 16 व्या वर्षातच हा प्रसिद्ध चित्रपट केला होता साईन…

दिव्या भारतीने जाता जाता या अभिनेत्रीला रातोरात बनविले होते सुपरस्टार, पहा 16 व्या वर्षातच हा प्रसिद्ध चित्रपट केला होता साईन…

आज आपण अशा एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी आज या जगात नाही आहे. ज्या अभिनेत्रींने संपूर्ण रसिक वर्गाला वेढ लावून टाकले होते. त्यावेळी सर्वांत युवा अभिनेत्रीं म्हणून लोक तिला ओळखु लागले होते. पण या अभिनेत्रीने या जगातून जाता जाता एका अभिनेत्रीला रातोरात सुपरस्टार बनवलं. होय, आपण ९० च्या दशकांतील सुपरस्टार दिव्य भारतीबद्दल बोलत आहोत.

महत्त्वाचे म्हणजे दिव्या भारती या जगातून जाताच ही अभिनेत्री सुपरस्टार बनविली. वास्तविक, जेव्हा दिव्या भारती चौदा वर्षांची होती, तेव्हा तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर येऊ लागल्या. यामुळे लहान वयातच दिव्या भारतीने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. पण खरी प्रसिद्धी तिला ‘विश्वात्मा’ या हिंदी चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाच्या “सात समुद्र पार” या गाण्यामुळे ती रातोरात प्रकाश झोतात आली.

ही बॉलिवूड अभिनेत्री सुपरस्टार बनली:-

अगदी बॉलिवूडमधील सर्व चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटात दिव्या भारतीला घेण्याची इच्छा असायची. या व्यतिरिक्त काही चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वीच तिला त्याच्या चित्रपटात साईन केले होते. अशा परिस्थितीत जेव्हा दिव्या भारतीच्या अचानक मृत्यूची बातमी बाहेर आली तेव्हा सर्व चित्रपट निर्मात्यांना धक्का बसला. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती, प्रेक्षक तिच्या सौदर्यामुळे पार वेडे झाले होते.

मात्र, म-र-ण्याआधी दिव्या भारतीने मोहरा नावाचा एक मोठा सुपरहिट चित्रपट साईन केला होता. ज्यामध्ये सुनील शेट्टी, अक्षय कुमार, रविना टंडन, हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला, आणि प्रेक्षकांनी या स्टार कास्टला अगदी डोक्यावर घेतले. होय, मोहरा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडला हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. या चित्रपतील ”टिप टिप बरसा पानी” हे गाणे आजही तितकेच फेमस आहे.

कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री:-

आपल्याला कदाचित माहित नसेल पण, मोहरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजीव रायने प्रथम दिव्या भरतीला साइन केले होते. पण तिच्या अकस्मात निधनानंतर ही भूमिका रवीना टंडन हिला मिळाली. दिव्या भारतीने या चित्रपटाचे काही सीन सुद्धा शूट केले होते. अशा परिस्थितीत दिव्या भारतीने या जगातून जाताना बॉलिवूडची सुपर कूल गर्ल रवीना टंडनला सुपरस्टार बनवले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वास्तविक मोहरा या चित्रपटानंतर रवीना टंडनने बॉलिवूडवर राज्य केले.

होय, मोहरा चित्रपटानंतर रवीना टंडन रातोरात सुपरस्टार झाली. तथापि, जर दिव्या भारतीचा अचानक मृ-त्यू झाला नसता तर रवीना टंडन आज तितकी फेमस नसती. विशेष म्हणजे एकीकडे चित्रपटाच्या ”टिप टिप बरसा पानी” या गीताने प्रेक्षकांची मने जिंकली तर दुसरीकडे चित्रपटानेही खूपच कमाई केली. पण मोहरा या चित्रपटाआधी ही रवीना टंडनने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु तिला मोहरा या चित्रपटातून मिळालेली ओळख तिला इतर कोणत्याही चित्रपटातून मिळू शकली नसती.

होय, रवीना टंडनला हा चित्रपट मिळाला नसता तर, बॉलिवूडमध्ये आपले नाव बनवण्यासाठी कदाचित तिला अधिक वेळ लागला असता. तसे, आपणाला सांगू इच्छितो की रवीना टंडन आणि दिव्या भारती खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्या दोघांनीही एका चित्रपटात काम केले होते. तरी आपण असे म्हणू शकतो की दिव्या भारतीने जाताना तिची मित्रता दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12