बोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते या क्रिकेटपटूची बहीण..फोटो होताय व्हायरल…

बोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते या क्रिकेटपटूची बहीण..फोटो होताय व्हायरल…

सध्या सगळीकडेच क्रिकेटच्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यातच श्रीलंका दौऱ्यातील अनेक खेळाडू सगळीकडेच चर्चेत आले आहेत. टीम इंडियाच्या खेळाचे सगळीकडूनच कौतुक करण्यात येत आहे. काहीच दिवसांपूर्वी विराट कोहलीने आपल्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्याने चांगल्याच बातम्या रंगवल्या.

आणि आता अजून एक क्रिकेटपटू प्रकाशझोतात आला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू त्याच्या खेळामुळे नाही तर त्याच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीमुळे चर्चेत आला आहे. हा खेळाडू अजून कोणी नसून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आहे. दीपकची लव्हस्टोरी आपल्या सर्वाना ठाऊकच आहे.

मात्र त्याची बहीण मालती चहरही तिच्या भावापेक्षा प्रसिद्ध आहे हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. सुपरमॉडेल आणि अभिनेत्री मालती चहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकत असते. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरची बहीण मालती चहर हिचा भावीन भानुशाली अभिनीत ‘इश्क पश्मिना’ नावाचा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

मुख्य अभिनेत्री म्हणून मालतीचा हा पहिलाच चित्रपट आहे. मालती चहर व्यवसायाने सुपरमॉडेल आहे. मालती चहरच्या ‘इश्क पश्मिना’, ‘दे दे प्यार दे’, ‘वेल्लापंती’ आणि ‘ए.आय. SHA: My Virtual Girlfriend सारख्या चित्रपटात दिसली आहे. मालती चहरने 2017 मध्ये ‘मॅनिक्योर’ चित्रपटातून पदार्पण केले.

‘जिनियस’ आणि ‘हुश’ सारख्या चित्रपटात देखील ती झळकली आहे. मालती चहरने अनेक वेब सिरीज आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे. मालतीने अनेक सौंदर्य स्पर्धाही जिंकल्या आहेत. मालती फेमिना मिस इंडिया दिल्ली 2014 ची सेकंड रनर अप आहे. ती फेमिना मिस फोटोजेनिक आणि मिस सुडोकूचीही विजेती आहे.

2009 मध्ये तिने मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. इंस्टाग्रामवर त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मालती चहर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीची मोठी फॅन आहे. मालतीलाही क्रिकेटची खूप आवड आहे.

लहानपणापासून मालती आपल्या भावांसोबत क्रिकेटही खेळत असल्याने तिची या खेळाकडे ओढ अधिक आहे. मालती चहर 2018 च्या IPL दरम्यान पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली. चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यादरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाली, त्यानंतर ती सोशल मीडियावर ‘आयपीएलची मिस्ट्री गर्ल’ बनली.

काही काळानंतर ती दीपक चहरची बहीण असल्याचे समोर आले. तेव्हापासून ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. मालती चहर खूप सुंदर आहे. मॉडेलिंगच्या दुनियेत चांगले नाव कमावल्यानंतर मलाकीला आता बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही नाव कमवायचे आहे. मालती बॉलीवूडमध्ये स्वत:चे नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

मालती चहरने नुकतंच तिचा एक फोटो शेअर केला आहे. मालतीचा हा बिकिनीमधील फोटो आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. मालती चहरने स्विमिंग पूलजवळ बिकिनी घातलेला तिचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मालतीने लिहिले आहे – 2023 चा पहिला फोटो. मालतीच्या या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. अनेकांनी तर तिची तुलना थेट कतरीना कैफ सोबत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12