OMG ! आपल्या पश्चात पत्नीसाठी एवढी संपत्ती सोडून गेले दिलीप कुमार, संपत्ती बघून चकित व्हाल..

मुघले-ए-आझम, अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर हे असे सिनेमा आहेत, ज्यांचे रिप्लेसमेंट बॉलीवूडमध्ये होऊच शकत नाही. या सिनेमांचे प्रमख आकर्षण होते दिलीप कुमार. आजही या सिनेमांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.
केवळ, जुने लोक किंवा सत्तरच्या दशकातील लोकच नाही तर, आजच्या दशकातील प्रेक्षक देखील या सिनेमाचा आनंद घेतात. आपल्या दमदार अभिनयाने या सिनेमाचा दर्जाचं दिलीप कुमार यांनी उंचावला होता. दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं, आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती.
त्यामुळेच,आजही भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार, स्ट्रगलर्स त्यांना आपला आदर्श मानतात. बऱ्याच कलाकारांनी, त्यांची नक्कल करत बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. बॉलीवूड मधील ट्रॅजिडी किंग म्हणजेच दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं काल सकाळी नि’धन झालं आहे.
बुधवारी सकाळी खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ११ डिसेंबर, १९२२ साली पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव युसुफ खान होते. सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा देविका राणी यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६२ सिनेमात काम केले. त्यांनी शेवटचा सिनेमा फक्त १२ लाख रुपयात साइन केला होता आणि त्यांना पूर्ण रक्कम कॅशमध्ये मिळाली होती. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. मीडिया पोर्टल सेलिब्रेटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांची संपत्ती जवळपास ८.५ कोटी डॉलर इतकी आहे. हे रुपयात सांगायचे तर ६३४.२१ कोटी रुपये होते.
दिलीप कुमार यांचे इन्कम सोर्सचे स्त्रोत अभिनयच आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते. दिलीप कुमार त्यांच्या काळात सर्वाधीक मानधन घेणार कलाकार होते. १९५०च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेत होते. ही रक्कम त्याकाळात खूप जास्त होती. इतर कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.
मात्र दिलीप कुमार यांना झगमगाटीपासून दूर रहायला आवडत होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांनी एकदा सांगितले होते की त्यांचे कपडे ते पाली नाका येथील एका टेलरकडून शिवतात. हा टेलर तेव्हापासून त्यांचे कपडे शिवत होता जेव्हा ते वांद्रे येथे राहत होते.