सिद्धार्थ मल्याच्या या एका वाईट कृत्यामुळे दीपिकाने केले होते ब्रे-कअप, म्हणाली सिद्धार्थने मला एकदा मोठ्या हॉटेलमध्ये नेऊन….

दीपिका पादुकोण हे दिवस पती रणवीर सिंगसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. तथापि, तीचे इतिहासकालीन आयुष्य इतके सोपे नव्हते आणि तिच्या पूर्वीच्या आयुष्यात बरेच चढउतार येत होते. एक काळ असा होता की दीपिका विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तथापि, हे संबंध फार काळ टिकले नाहीत आणि 2 वर्षात या दोघांचाही ब्रेकअप झाला होता.
नंतर दीपिकाने एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्ल्याशी असलेले आपले संबंध तुटण्याचे कारण सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्या यांनी 2010 मध्ये डेटिंग सुरू केले होती. पण 2 वर्षानंतर म्हणजेच 2012 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. खरंतर दीपिका रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर वाईट दिवसांतून जात होती.
अशा परिस्थितीत सिद्धार्थ मल्ल्या याने दीपिकाला त्या काळात सहारा दिला होता. एका मुलाखतीत दीपिकाला जेव्हा पुरस्कार सोहळ्यामध्ये सिद्धार्थ मल्ल्या बद्दल विचारले गेले तेव्हा दीपिकाने कबूल केले होते की ती सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दीपिका आणि सिद्धार्थ अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यात एकत्र दिसले होते. आयपीएल सामन्यातही हे दोघे बर्याचदा एकत्र दिसले.
मात्र, एका दिवस अचानक दीपिकाने घोषित केले की, ती आता सिद्धार्थ मल्ल्यासोबत कोनतेही संबंध ठेवत नाही. नंतर आयबी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली होती, ‘हे नाते वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण सिद्धार्थचे वागणे खूप विचित्र होत चालले होते. शेवटच्या वेळी आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा त्याने हॉटेलचे बिल मला भरण्यास सांगितले होते.
वास्तविक मला सिध्दार्थ एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. परंतु जेवण झाल्यानंतर त्याने बिल मला पेड करण्यास सांगितले होते. हे पाहून मला फार विचित्र वाटलं होत. या घटनेनंतर मला हे नातं सोडण्याशिवाय पर्याय दिसला नाही. त्याचवेळी या प्रकरणावर सिद्धार्थ म्हणाले की, कोठे काय गोंधळ झाला आहे तिचे काय कन्फ्युजन झाले हे मला समजत नाहीये. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार ती एक वेडी बाई आहे.
सिद्धार्थ पुढे म्हणाला मी तीला सांगितले होते की एकदा माझ्या वडिलांचे सर्व कर्ज पेड होईल आणि सरकारने त्यांना सोडले की त्यानंतर मी तीचे सर्व पैसे परत करीन. पण ती माझे कोणतेही म्हणने ऐकण्यास तयार नव्हती. सिद्धार्थ मल्ल्या असेही म्हणाला की, ‘माझ्या कठीण काळात तिने मला सोडले. जेव्हा मी तिला महागड्या भेटवस्तू देत असे तेव्हाचे दिवस दीपिका विसरून गेली आहे. मी तिला मौल्यवान हिरे आणि लक्झरीयस बॅग्स देखील दिल्या आहे.
इतकेच नाही तर मी तीच्यासाठी तिच्या मित्रांना एक मोठी पार्टीदेखील दिली आहे. तरी पण ती सर्व काही विसरली आहे. दीपिका पादुकोणने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. ती विजय मल्ल्याच्या किंगफिशर कॅलेंडरची मॉडेलही राहिली आहे. मात्र, ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले.