महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी, तर हा दिग्गज दिसणार श्री कृष्णाच्या भूमिकेत?

महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी, तर हा दिग्गज दिसणार श्री कृष्णाच्या भूमिकेत?

महाभारत हा असा विषय आहे जो आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो. कारण आजही महाभारत या महाकाव्यातून आपल्याला आयुष्य जगण्याचा धडा मिळतो. पण आता लवकरच महाभारत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. याचे दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा सिनेमा तीन भागांमध्ये असणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका दीपिका पदुकोणची असणार आहे ती यात द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. पण कोणता अभिनेता यात श्रीकृष्णाची भूमिका करणार?.

एका रिपोर्ट नुसार या सिनेमाचे निर्माता मधु मंटेना आहे आणि ऋतिक रोशन त्यांचा खूप जवळचा मित्र आहे आणि त्यांना ह्रतिक रोशनला श्री कृष्णाच्या भूमिकेत बघायचे होते. म्हणून या सिनेमात ह्रतिक रोशन श्री कृष्णाची भूमिका साकारणार आहे. छपाक नंतर दीपिकाचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. महाभारतावर आधारीत असल्यामुळे हा चित्रपट दोन नाहीतर 3 भागांमध्ये बनु शकतो. आणि याचा पहिला भाग 2021 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो.

दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की, महाभारत या महाकाव्यातून आपल्याला आयुष्य जगण्याचा धडा मिळाला. आणि अशा चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी फार उत्सुक आहे. दरम्यान मधु मंटेना म्हणाले की लहानपणापासून आपल्याला महाभारत ऐकायला,बघायला आणि वाचायला मिळाले. पण आमचा हा चित्रपट द्रौपदी या पात्राभोवती फिरणारा असणार आहे. आणि दीपिका शिवाय दुसरी कोणतीच अभिनेत्री हा अभिनय करू शकत नाही असे मला वाटते. कारण तिच्या अभिनयाच्या जोरावर ती या पात्राला एक वेगळ्या उंचीवर नेऊन सोडेल. तीच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.