दैविक शास्त्रानुसार देव घरातील अधिक तसबिरिंचे विसर्जन करने योग्य आहे का ? पहा ..

घर लहान असो वा मोठे, त्यात पूजाघर हवेच. हे प्रार्थनास्थान असल्याने त्याना नेहमीच प्राधान्य द्यावे. घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे देवघराविषयी..
काही लोकं देवघरातील देव उगाच वाढवीत असतात. कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो वा मूर्ती आणून लगेच देवघरात ठेवतील! याचा परिणाम असा होतो की, पुढे पुढे वयोमानानुसार वाढलेल्या देवांची पूजा करणे जमत नाही.
नाईलाजास्तव मग बहुतेक लोक असे फोटो वाहत्या पाण्यात सोडण्याचा विचार करतात. परंतु अस केल्याने पाण्याचे प्रदूषणात वाढ होऊ लागते.
देव्हा-यात मूर्तींची गर्दी करू नये – एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नयेत. देव्हरा-यात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरा गेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात कारण ते अमंगल समजले जाते,”
या साठीच देव वाढवतानाच विचार करावा. थोडे देव असतील तर त्यांची पूजा नीट होते. म्हणून देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती असल्यास फक्त एकच मूर्ती ठेवावी व बाकीच्यांचे गुरुजींकडून शास्त्रोक्त विसर्जन करून घ्यावे.
यात देवाचा कोप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मूर्तीप्रमाणे तसबीरीची प्राण प्रतिष्ठा झालेली नसते. या साठी तसबीरी कमी करताना त्या त्या दैवतांची क्षमा मागावी व त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी व जास्तीच्या तसबीरी काढून ठेवाव्यात. यात कसलाही दोष लागत नाही.