क्रिकेटर्ससोबत लग्न करून ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःच संपविले स्वतःचे बॉलिवूड करिअर, पहा नंबर ४ मिस इंडिया असूनही…

क्रिकेटर्ससोबत लग्न करून ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःच संपविले स्वतःचे बॉलिवूड करिअर, पहा नंबर ४ मिस इंडिया असूनही…

आपल्या बॉलीवूड मध्ये एकाहून एक सुंदर अश्या अभिनेत्री आहेत. त्या समोर आल्यांनतर कोणी आपले भान नाही सोडले तर ते नवलंच. त्यांचे सौंदर्य बघून सर्वसामान्य च नाही बिजनेसमॅन, खेळाडू, अभिनेते इ सर्वच त्यांचे चाहते बनतातच. आणि जी अभिनेत्री आपल्याला आवडते ती समोर आल्यानंतर आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी कोणीच सोडत नाही आणि आपले क्रिकेटर तर कधीच नाही.

यातूनच काही नवीन प्रेम कथा सुरु होतात आणि त्यापैकी काही पूर्ण देखील होतात. मग खेळाडू जेव्हा ग्राऊंडवर असतो, तेव्हा त्याची गर्लफ्रेंड त्याला चिअर करताना आपल्या दिसते. आणि मग त्यांच्या नात्याचा अंदाज सर्वाना येतो. क्रिकेटर बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींसोबत लग्न करतात, मात्र त्यापैकी बऱ्याच अभिनेत्री पुढे आपले करिअर किंवा काम करत नाही.

क्रिकेटच्या ग्राऊंडवर आपल्या पतीला चिअर करताना, या अभिनेत्री दिसतात मात्र सिनेमा मध्ये त्यांचे दर्शन होत नाही. या पाच अगदी सुंदर अश्या अभिनेत्रींनी आपल्या विवाहानंतर बॉलीवूडला रामराम ठोकला.

नताशा स्टेनकोविक :-हार्दिक पंड्या नेहमीच चर्चेत असणारा खेळाडू आहे.ग्राऊंडवर असेल तेव्हा त्यांचा उत्कृष्ट खेळासाठी, अन बाहेर असेल तेव्हा त्याच्या बिनधास्त ऍटिट्यूड ची चर्चा असते. हाच त्याचा बिनधास्त ऍटिट्यूड त्याच्या प्रेमात देखील दिसून आला. अचानकच एक दिवस हार्दिकने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून नताशा सोबत एंगेजमेंट केल्याचे जाहीर केले.

त्यानंतर काहीच दिवसांत, नताशा गरोदर असून ते आता वडील होणार असल्याची बातमी दिली. आजही आपल्या देशात लग्नाच्या आधी, कपल सोबत बाहेर फिरत असलेले देखील जमत नाही मात्र या पठ्ठ्याने लग्न करण्याच्या आधीच बाप बनण्याचे सुख घेतले. लॉकडाऊन मधेच त्या दोघानी लग्न उरकून घेतले. मात्र हार्दिक आणि त्याने प्रेम देखील त्याच्यासारखेच भन्नाट आहे. नताशाने मात्र, आता बॉलीवूडला पूर्णपणे रामराम ठोकला आहे.

संगीता बिजलानी :-आजही असे बोलतात की, सलमान खान ने जर कोणासोबत लग्न केले असते तर ती होती संगीता बिजलानी. ८० आणि ९० च्या दशकामधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून संगीताची चर्चा सगळीकडेच होती. बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी तिने मिस इंडिया प्रतियोगिता देखील जिंकली होती.

असे सांगितले जाते, सलमान आणि तिच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या मात्र ती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद अझहर च्या प्रेमात पडली होती. त्यावेळी अझरचा विवाह झालेला होता आणि त्याला दोन मुले देखील होते. मात्र संगीता आणि अझहर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते आणि म्हणून त्यांनी विवाह केला. मात्र, संगीताने लग्नानंतर पूर्ण लक्ष आपल्या संसाराला दिले आणि यशाच्या शिखरावर असताना आपले करिअर सोडले.

हेजल कीच :-युवराज सिंगने जणू ठरवलेच होते कि, बॉलीवूडच्या एखाद्या सुंदर अभिनेत्री सोबतच विवाह करणार. त्याच्या अ’फेअरच्या अनेक चर्चा ऐकल्या होत्या. रविना टंडन पासून ते दीपिका पर्यंत त्याच्या अ’फेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हेजलसोबत त्याने विवाह केला. कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या प्रेमकथेचा खुलासा युवराजने केला होता.

लग्नाच्या तब्ब्ल अडीच वर्ष आधीपासून तो हेजल ला लग्नासाठी मनवत होता. अखेर, हेजलने होकार दिला आणि २०१६ मध्ये त्यांनी विवाह केला. बॉडीगार्ड सिनेमामध्ये करीनाच्या मैत्रिणीचा रोल करणारी हेजल मात्र आता सिनेमामध्ये काम करणार नाही असे, एका मुखातीमध्ये तिनेच सांगितले आहे.

सागरिका घाटगे :-चकदे इंडिया गर्ल सागरिका हि प्रसिद्ध अभिनेते विजय घाटगे यांची मुलगी आहे. तिने काही मराठी सिनेमा मध्ये देखील काम केले आहे. जहीर खान याच्या मात्र, इशा शेरवानी सोबतच्या अफेअर च्या चर्चा होत्या. असे सांगितले जाते कि, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता.

मात्र, पुढे त्यांच्यामधील मतभेद वाढत गेले आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. त्याच दरम्यान आयपीएल च्या काही सामन्यांच्या वेळी सागरिका आणि जहीर दोघे जवळ आले आणि त्यांनी लग्न केलं. २०१७ मध्ये जहीर आणि सागरिका या दोघांचे लग्न झाले मात्र त्यानंतर सागरिकाला कोणत्याही सिनेमामध्ये बघितले नाही गेले.

गीता बसरा :- द ट्रेन या सिनेमाची अभिनेत्री गीता, त्यादरम्यान हजारो चाहत्यांची आवडती होती. हरभजन आणि तिची ओळख एका इव्हेंट मध्ये झाली आणि इंग्लिश शिकण्याच्या कारणाने हरभजन ने तिच्यासोबत मैत्री केली. त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यानंतर, गीताने मात्र सिनेमाला रामराम ठोकला.

अनुष्का शर्मा :- अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे नाते खरोखर एखाद्या फिल्मच्या कथानकांप्रमाणेच आहे. जाहिरातीच्या शूटिंगच्या दरम्यान दोघांची भेट झाली, आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री झली. त्या जाहिरातीमध्ये दोघांची केमिस्ट्री बघूनच काहींनी सांगितले होते, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत म्हणून.

दरम्यान त्यांनी आपल्या नात्याचा खुलासा केला नसला तरीही विराट कोहलीचे सामने बघायला अनुष्काची हजेरी खूप काही सांगून जात होती. मात्र, त्यांच्यात मतभेद वाढून ते वेगळे देखील झाले होते. पण, ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि सोबत लग्न केले. लग्नानंतर, अनुष्काने वेब-सिरीज देखील प्रोड्युस केली आहे.पण तिने त्यानंतर अजून, अभिनय नाही केला. त्यामुळे, अजूनही ती पुढे अभिनेत्री म्हणून काम करेल की नाही याबद्दल शंकाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12