धक्कादायक ! गेल्या २ महिन्यांपासून जीवनाशी झुंज देणारा प्रसिद्ध कॉमेडियन हरपला….

धक्कादायक ! गेल्या २ महिन्यांपासून जीवनाशी झुंज देणारा प्रसिद्ध कॉमेडियन हरपला….

सुरुवातीपासूनच कॉमेडी हा पैलू काहीच प्रमाणात दुर्लक्षित राहिलाय. कॉमेडी करणे हसण्याइतके सोपे नाही. आपल्या विशेष शैलीचा वापर करत समोरच्याला कोणत्याही परिस्थितीत हसायला लावने हे सर्वात अवघड काम आहे. परंतु रसिक म्हणून कायमच प्रेक्षकांनी कॉमेडीला सुरुवातीच्या काळात दुय्यम दर्जा दिला.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज च्या माध्यमातून भारतामध्ये कॉमेडी कलाकारांची स्थिती बऱ्याच प्रमाणात बदलले. या माध्यमातून अनेक विनोदी कलाकार देशा समोर आले. मागील कित्येक वर्षांपासून स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपडत असणाऱ्या कलाकारांना एक खास प्लॅटफॉर्म मिळाला होता. यापैकीच एक होते राजू श्रीवास्तव.

राजू श्रीवास्तव हे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होते. छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काही भूमिका देखील त्यांनी साकारल्या होत्या. मात्र द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्यांना खास ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केवळ देशातच नाही जगात देखील त्यांचे अनेक वेगवेगळे स्टेज शो झाले.

दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृ’दय विकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव जिम मध्ये व्यायाम करत होते. त्यावेळी अचानकच त्यांना हृदय वि’काराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देश आणि जगातून राजूसाठी त्याचे चाहते प्रार्थना करत होते, मात्र राजूने जगाचा निरोप घेतला आहे. राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांनी 10.20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी हृ’दयवि’काराचा झ’टका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

त्याच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि सहकाऱ्यांकडून सतत अपडेट्स मिळत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमीही आली होती, मात्र आता त्यांच्या नि’धनाच्या दु:खद बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.