इतक्या करोडोची संपत्ती कमावलीय या 12 वर्षीय बाल कलाकाराने, करतेय या सीरियल मध्ये काम.

यशाचे शिखर गाठण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. वय कोणत्याही यशस्वीतेसाठी कधीच कारण बनत नसते, कदाचित म्हणूनच कधीकधी लहान मुले देखील अल्पवयात इतकं काही कमवतात की वडीलधारे लोक देखील त्यांची संपत्ती बघून आश्चर्यचकित होतात, त्यांची प्रतिभा इतकी प्रतिभावान असते की ते प्रत्येकाची मने जिंकतात.
आज आम्ही अशाच एका बालकलाकार हिचे बद्धल तुम्हाला सांगणार आहोत. की जी अवघ्या 12 व्या वर्षीच झालीय करोडोंची मालकीन. शुटींग सेट वर देखील ती लॅक्सरियस कार शिवाय येत नाही. तर बघुयात कोण आहेत ती अल्पवयीन कलाकार.
स्टार प्लसच्या प्रसिद्ध सीरियल मधील या वेळी अशीच एक बाल कलाकार ‘ये है मोहब्बत्ते’ या मालिकेतील रोहनिका धवन चे नाव समोर येत आहे, रोहनिका या मालिकेत अगोदर रुहीच्या भूमिकेत होती तर आता पिहुची मुख्य भूमिका साकारत आहे. ही लहान वयात आपली भूमिका साकारणार्या एका निरागस मुलीची कहाणी आहे. तिचा चांगला अभिनय आणि त्यामुळे मिळालेले यश बघून मोठे मोठे स्टार देखील आश्चर्यचकित होत आहेत.
रोहनिका धवनला रुही म्हना किंवा पीहू किंवा आशी म्हणा, जसा रोल मिळेल तो व्यवस्थित साकार करण्याचं काम रोहनिका धवनने छोट्या पडद्यावर सिद्ध केले आणि म्हणूनच 2014 मध्ये “मोस्ट पॉप्युलर चाइल्ड आर्टिस्ट” ने रुहानिका धवनला गौरविण्यात आले आहे.
स्टायलिश राहणीमान :-
आज आम्ही तुम्हाला ‘ये है मोहब्बते शो मधील बाल कलाकार’, चे लाईफ स्टाईल व जीवनशैली बद्धल सांगणार आहोत. ती तिच्या अभिनयाने खूप प्रसिद्ध झाली आहे व तिने स्वतःचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स देखील वाढवले आहेत. तिच्याबद्दल हे जाणून घेऊन तुम्ही नक्कीच चकित व्हाल की या मालिकेत ती जरी साधारण मुलीचा रोल करत असली तरी पण खऱ्या आयुष्यात ती खूप च क्यूट आणि गमतीदार जीवन जगत आहेत.
लोकप्रियता :-
अवघ्या दहा वर्षांच्या वयातच लोकप्रिय झालेल्या रुहानिका धवनचे तिच्या इंस्टाग्रामवर सुमारे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत जेणेकरुन आपण तिच्या लोकप्रियतेचा सहज अंदाज घेऊ शकता.
जगतेय लक्झरीयस जीवन :
आता आम्ही तुम्हाला रूहानिकाच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल सांगनार आहोत.
बर्याच काळापासून या शो मध्ये काम करत आलेली आहे रुहानिका आणि यावेळी तिची निव्वळ संपत्ती सुमारे 1 मिलियन डॉलर्स म्हणजेच 6.5 कोटी रुपये आहे. ती स्वतःचे जीवन अगदी ऐशो आरामात जगत आहे.
जेव्हा जेव्हा ती शूटिंगसाठी घरून येते तेव्हा यासाठी तिच्याकडे 50 लाखांची ऑडी ए 4 कार आहे. ज्यामध्ये रूहानिका शूटिंग साठी बसून येते. एव्हढेच नाही तर मुंबईत, रोहनिका आपल्या कुटुंबासह स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहते.
सीरियलच्या शुटिंगसाठी रुहानिका शाळा सुटले नंतर जाते. संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत रुहानिकाचे शूटिंग होते आणि रुहानिका त्यानंतरचा उर्वरित वेळ अभ्यासामध्ये देते. मल्टी-टॅलेन्टेड रूहानिकाने झलक दिखला जा सीझन 9 मध्ये वाइल्ड कार्डच्या माध्यमातून भाग घेतला आहे, एका मुलाखती दरम्यान, तिने सांगितले की तिला अभ्यासामध्ये देखील रस आहे आणि मॅथ्स, कला, विज्ञान यासारखे विषय तिला आवडतात. रुहानिका तिच्या भविष्याकडे आणि करिअर कडे लक्ष केंद्रित करते आणि तिला असा विश्वास आहे की अभिनयाबरोबरच तिला बरेच काही करायचे आहे.
आश्चर्यकारक अभिव्यक्ती :-
आश्चर्यकारक निरागसता आणि आश्चर्यकारक कामगिरी. म्हणूनच जेव्हा जेव्हा ती पडद्यावर येते, तेव्हा लाखो दर्शक तिची भूमिका पाहतात. ती स्वत: ची आणि तिच्या प्रियजनांची स्वप्ने साकार करत आहे.