ढुंग्या, धैर्या, कबिरच्या पॅंटीत आग लावणाऱ्या चड्डीतल्या पोरीचा चेहरा आला समोर! पहा ‘बॉईज-3’च्या नव्या अभिनेत्रीचा ‘हा’ हॉट Video…

हल्ली सगळीकडेच सिक्वल चित्रपटांचे ट्रेंड बघायला मिळत आहे. हॉलीवुड, बॉलीवूडच काय साउथचे देखील अनेक चित्रपटांचे सिक्वलस पाहायला मिळत आहेत. पहिला चित्रपट सुपरहिट ठरला की, त्याला घेऊन त्याच संदर्भात एखादा दुसरा चित्रपट तयार करणे हे काय आता नवीन नाही.
बॉलिवूडचे अनेक चित्रपट आपल्या भेटीला आले आहेत. त्यापैकी काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तर काहींकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मराठी सिनेसृष्टी मध्ये त्या तुलनेत खूपच कमी सिक्वल्स पाहायला मिळत आहेत. अशाच काही सिक्वेल्स पैकी एक बॉईज चित्रपट देखील आहे.
बॉईज आणि बॉईज 2 या दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धिंगानाच घातला होता. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाची भन्नाट मस्तीने प्रेक्षकांच्या मनावर एक अनोखी छाप सोडली. या दोन्ही पर्वांमध्ये तिघांच्या आयुष्यात येणारी एक मुलगी हा अतिशय वेगळाच विषय ठरला होता.
त्यामुळेच बॉईज ३च्या घोषणेनंतरच यामध्ये आता कोणती तोडीस तोड अभिनेत्री असणार यावर तर्कवितर्क लावले जात होते. मागील बऱ्याच महिन्यांपासून बॉईज तीन मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची झलक पाहण्याची वाट बघत असणाऱ्या चाहत्यांची आता प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. नुकतच या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी या अभिनेत्रीला तुम्ही कुठेही पाहिले नसेल. बॉईज तीन याच चित्रपटातून ती सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. काहीच दिवसांपूर्वी या तिघांच्या आयुष्यात आलेली ती मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. परंतु तिचा केवळ अर्धाच चेहरा दिसत होता. कधी पारंपारिक पोशाखात तर कधी ग्लॅमरस अशा लुक मध्ये असणारी ती नेमकी कोण याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती.
आणि आता अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला आहे. बॉईज३ च ट्रेलर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर मध्ये तिघेजण एका पिवळ्या रंगाच्या स्पोर्ट्स कार मध्ये बसल्याचे दिसत आहेत. त्यावेळी ढुंग्या, कबीर सोबत पहिल्या सीटवर बसतो. तेव्हा कबीर त्याला मागे बसायला सांगतो.
मग ढुंग्या विचारतो की, इथे अजून कोण बसायला येणार? त्यावेळी कबीर म्हणतो नवीन चित्रपट तेव्हा नवीन मुलगी. आणि एन्ट्री होते त्या अभिनेत्रीची. या चित्रपटात त्या मुलीची व्यक्तिरेखा विदुला चौगुले साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्या लुक मध्ये विदुला चौगुले पारंपारिक पोशाखात दिसली. यावेळी ती खूपच शांत सभ्य मुलगी असल्याचे दिसते.
तर लगेच दुसऱ्या लुक मध्ये मात्र तिला बघून हे त्रिकूट देखील शॉक होते. दुसऱ्या लुक मध्ये विदुलाचा अतिशय ग्लॅमरस असा अवतार बघायला मिळत आहे. त्यामुळे आता विदुला या त्रिकूटावर भारी पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्रेलर मध्ये पुन्हा एकदा हे तिघे चांगलीच मस्ती करणार असल्याचे दिसत आहे. तर 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.