प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या प्रेमाला विसरले हे 10 सेलिब्रिटी

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी नावलौकिक आणि कीर्ती मिळविण्यापूर्वी कुणावर तरी प्रेम करत होते, परंतु जसे ते आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत प्रगती करत गेले व नावलौकिक झाले, तसे त्यांनी पहिल्या प्रेमापासून स्वताला दूर केले. येथे आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. पाहा पुढे वाचा कोणती आहेत ते सेलिब्रिटी.
दीपिका पादुकोण :
दीपिका ही सुरुवातीला तिच्या करीयर मधील संघर्षाच्या दिवसात दीपिका मॉडेल आणि अभिनेता निहार पांड्या यांच्या प्रेमात होती. बर्याच काळापासून ती त्याच्याबरोबर लिव्ह- इन रिलेशनशिप मध्येही होती, परंतु शाहरुख खानचा चित्रपट ओम शांती ओम मध्ये मुख्य नायिका म्हणून काम मिळाले नंतर तिने तिच्या तिचे पहिल्या प्रेमाला विसरायला जरा देखील उशीर केला नाही.
प्रियंका चोप्रा :
आपल्या मोडेलींगच्या दिवसात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा असीम मर्चंटच्या प्रेमात होती, परंतु मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवल्यानंतर प्रियंका चोप्राने त्याच्याशी संबंध तोडले. तसेच, त्यानंतर प्रियांकाचे शाहिद कपूरसोबत व इतर अनेकांशी प्रेमसंबंध होते, पण कोणाचेही नाते काही जास्त काळ चांगले राहिले नाही.
अनुष्का शर्मा :
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनुष्का शर्मा तिचा प्रियकर जोहेब युसूफच्या प्रेमात होती. मुंबईमध्येसुद्धा दोघे एकत्र आले आणि दोन वर्षे एकत्र राहिले. अनुष्काने बॉलिवूडमध्ये यशाची शिडी चढताच ती जोहरला विसरुन गेली.
ऐश्वर्या राय बच्चन :
ऐश्वर्या राय तिच्या मॉडेलिंगच्या काळात राजीव मूलचंदानी यांना डेट करत होती. ऐश्वर्याला यश मिळविल्यामुळे ती राजीवपासून दूर गेली आणि हळूहळू तिने पहिले प्रेम दूर केले.
कंगना रनौत :
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत यांना शेखर सुमनचा मुलगा अद्ययन आवडत होता, पण जेव्हा ती यशाच्या पायर्या चढत गेली आणि बॉलिवूडमध्ये यशस्वी होत गेली, तेव्हा हळू हळू ती अध्ययनपासून दूर गेली आणि अशा प्रकारे तिचे पहिले प्रेम विसरले गेले.
जॅकलिन फर्नांडिस :
सुरुवातीच्या काळात बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफा ला जॅकलिनने डेट केले होते, पण बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर हे नातं हळू हळू कमी झालं आणि तिने पहिले प्रेम विसरून ती पुढे सरसावली.
अर्जुन कपूर :
सलमान खानची बहीण अर्पिता खानला अर्जुन कपूर यांनी 2 वर्षे डेट केले. नंतर दोघे वेगळे झाले. आपल्या पहिल्या प्रेमाला विसरून अर्जुन कपूर सलमान खानची एक्स भाबी मलाइका हिला डेट करताना दिसला आहे.
आलिया भट्ट :
आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिचा बालपणीचा मित्र अली दादरकर यांना डेट करत होती, पण बॉलिवूडमध्ये यशाची शिडी चढल्यानंतर तिने अलीशी ब्रेकअप केले आणि तिचे पहिले प्रेम विसरले.
रणबीर कपूर :
जेव्हा रणबीर कपूर लाइमलाइटपासून दूर होता तेव्हा तो अवंतिका मलिकच्या प्रेमात होता आणि त्याचे शो जस्ट लव्हच्या सेटवर नेहमी पोहोचत होते. तथापि, रणबीरसुद्धा आपले पहिले प्रेम विसरला आहे आणि आता तो आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अशा प्रकारे कामयाबी चां विकृत स्वाद चाखल्यानंतर हे बॉलीवुड सितारे पहिल्या प्रेमाला विसरून गेले.