बॉलीवुड मधील ह्या 6 अभिनेत्री आजही रहात आहेत त्यांचे पतीपासून विभक्त, जगत आहे असे जीवन

बॉलीवुड मधील ह्या 6 अभिनेत्री आजही रहात आहेत त्यांचे पतीपासून विभक्त, जगत आहे असे जीवन

जर एखादी सामान्य मुलगी लग्न करुन घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या मुलांबरोबर राहिली तर इतर लोक त्या मुलीला जगने मुश्किल करून सोडू शकतात. इतरांच सोडा पण घरातील लोकच तिला नीट जगू देत नहीं, आणि हे अगदी खरे आहे परंतु सेलिब्रिटीसाठी ह्या गोष्टी अगदी सोप्या आहे. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी घटस्फोट घेतला आहे आणि आज आपल्या मुलांसमवेत एकटेच राहत आहेत. त्या आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांची उणीव भासू देत नाही आणि एक जबाबदार आईची भूमिका काटेकोर बजवत आहेत.

चित्रपटांमध्ये सर्व प्रकारच्या पात्रे साकारताना त्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट बनतात आणि त्यांच्या मुलांना एकट्याने वाढवण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होत असते. ह्या 6 अभिनेत्री त्यांच्या पतीशिवाय मुलांसह आपले आयुष्य व्यतीत करीत आहेत, या अभिनेत्रींमध्ये तुमच्याही काही फेवरेट अभिनेत्री आहेत.

ह्या 6 अभिनेत्री ज्या पतीला सोडून मुलांसमवेत आयुष्य जगत आहेत

1. प्रीती झंगीयानी :
सन 2000 मध्ये, मोहब्बतें या चित्रपटापासून लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री प्रीती झंगीयानी हिने प्रवीण दाबासशी लग्न केले होते जी 2008 मध्ये पतीपासून विभक्त झाली. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. आणि आता प्रीती तिचा मुलगा जयवेश दाबास यांच्यासोबत पतीपासून विभक्त राहत आहे.

२. रीना दत्त :
आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तनेही घटस्फोटानंतर आपल्या मुलांना म्हणजेच जुनेब आणि इकरा खान या मुलांना एकट्याने वाढवले ​​आहे. आमिर आपल्या मुलांबरोबर सतत भेटत राहतो आणि रीनाबरोबर त्याचेही मैत्रीपूर्ण वर्तन आहे, परंतु ते सर्व एकत्र राहत नाहीत.

3. पूजा बेदी :
अभिनेत्री पूजा बेदीसुद्धा पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आलिया व ओमर ह्या मुलांचे एकटी संगोपन करत आहे. तिचा 2003 साली घटस्फोट झाला आणि 1994 मध्ये तिने फरहान फर्निचरवालाशी लग्न केले होते.

4. कोंकणा सेन :
बॉलिवूड अभिनेत्री कोंकणाने रणवीर शौरी शी लग्न केले होते आणि गरोदरपणात पतीला घटस्फोट दिला होता. मग त्यांना एक मुलगा झाला आणि कोकणा अजूनही तिचा मुलगा हरून शौरे याची देखभाल करत आहेत.

5. अमृता सिंग :
1991 मध्ये सैफ अली खानने अमृता सिंगशी लग्न केले होते. त्यानंतर 2004 साली त्यांचा घटस्फोट झाला, त्या दरम्यान त्यांना इब्राहिम अली खान आणि सारा अली खान अशी दोन मुले झाली. त्यावेळी अमृता ला 15 करोड रुपये देऊन मुलांची पालनपोषण खर्चाची जबाबदारी घेतली होती. तथापि, मुले बहुतेक करून अमृताबरोबरच राहिली आहेत कारण सैफ अली खानने करिना कपूरशी लग्न केले आहे आणि त्यांना मुलगा तैमूर देखील आहे.

6. करिश्मा कपूर :
90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार्या करिश्मा कपूरने 2004 मध्ये दिल्लीमध्ये राहणार्या संजय कपूरशी लग्न केले. बर्‍याच वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर 2016 साली या जोडप्याचा घटस्फोट झाला. करिश्माचा आरोप होता की संजय तिला मारहाण करीत असे आणि तिला वाईट वागणूक देत असे. त्यांना एक मुलगा कियान राज कपूर आणि मुलगी समायरा कपूर आहेत, जो घटस्फोटानंतर करिश्माच्या जवळच रहात आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.