बॉलीवुड ची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पडली होती या भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात….करणार होती लग्न …परंतु…

एक हसीना आणि एक खेळाडू यांच्या प्रेमाच्या कहाण्या अगदी सामान्य मानल्या जात आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेटचा जगाशी कित्येक दशकांपासून जुना संबंध आहे. बर्याचदा एखादा क्रिकेटपटू बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असतो आणि अचानक दोघांच्या लग्नाची बातमीही ऐकू येते. मग ते छोटा नवाब म्हणजेच सैफ अली खानचे माता पिता शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पटौदी यांची प्रेम कहाणी असो, किंवा विराट कोहली-अनुष्का शर्माशी लग्नाची कहाणी असो. क्रिकेट आणि ग्लॅमरचे तर खूप जुने नाते आहे आणि ते येथून पुढेही असेच चालूच राहणार आहे, पण आज आम्ही येथे तुम्हाला एका खास प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत ज्यात एक जगप्रसिद्ध क्रिकेटर आणि बॉलिवूड हसीना माधुरी दीक्षित धक धक गर्ल.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीम इंडियाचा हॅन्डसम उप-कर्णधार म्हणजेच माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाची प्रेमकथाही खूप रंजक होती. या दोघांच्या नावाबाबत बरीच चर्चा सुरू झाली होती. एकीकडे संपूर्ण भारत माधुरीच्या शैलीवर मरत असे, तर दुसरीकडे अजयवर ही लाखो मुली फिदा होत होत्या, पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. वास्तविक, या दोघांची प्रेमकथा एका मॅगझिन फोटोशूट दरम्यान सुरू झाली होती. वास्तविक, जडेजा आणि माधुरी एका प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर एकत्र दिसले, त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा होऊ लागली.
जडेजा आणि माधुरीच्या डेटिंगच्या बातम्यांच्या दरम्यान अशीही बातमी आली होती की अजयला बॉलिवूडमध्ये नायक म्हणून काम करायचं आहे. जेव्हा त्याने माधुरीला त्याच्या इच्छेबद्दल सांगितले तेव्हा तिने जडेजाला फिल्म इंडस्ट्रीतील बडे निर्माते आणि दिग्दर्शकांकडे जाण्याची शिफारस केली. माधुरीची मेहनतही रंगत आणणारी होती, पण अचानक जडेजाच्या नशिबाने असे वळण घेतले की सर्व काही क्षणात उध्वस्त झाले. माधुरीच्या सूचनेवरून अजय जडेजाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळू लागली होती की अचानक त्याची क्रिकेट मधील कारकीर्द ओसरू लागली. जाडेजासाठी तो काळ खूप कठीण होता. एकीकडे क्रिकेटमधील करिअर वाचवण्याच्या प्रयत्नात तो अपयशी ठरला होता, तर दुसरीकडे त्याला जे चित्रपटात काम देणार होते त्यांनीही जडेजाला कलटी मारली.
चला आता त्यांचे करिअरबद्दल बोलूया, आता आपण माधुरी आणि अजय जडेजाच्या प्रेमकथेकडे परत जाऊया. वृत्तानुसार, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पुरते वेडे झाले होते आणि त्यांनी त्यानंतर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सामान्य प्रियजनांच्या बाबतीत जसे घडते तसेच काहीसे यांचे पण घडले. कारण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोघांच्या प्रेमाचे आड कुटुंबातील तलवार मध्यभागी आली. बातमीनुसार अजय जडेजाचे कुटुंब हे दोघांच्या नात्याविरूद्ध होते, कारण जडेजा राजघराण्यातील आहे आणि माधुरी मध्यमवर्गीय मुलगी आहे, म्हणूनच जडेजाचे राजघराणे त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. जडेजा कुटूंबाशीही बंड करू शकला नाही आणि हळूहळू दोघांचं प्रेमाचं नातं कोमेजू लागलं. आता राहिली कसर 1999 साली निघाली ती अशी की तेव्हा अजय जडेजावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला गेला होता.
त्यावर्षी अजय जडेजाला सामना फिक्सिंगसाठी दोषी ठरविण्यात आले होते, त्यामध्ये तो संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनबरोबर सहभागी असल्याचे दिसून आले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश त्याच्याविरुध्द गेला होता, त्यानंतर माधुरीनेही जडेजा ला लगेच सोडला, कारण आता माधुरीचे कुटुंबही या नात्याविरुध्द गेले होते. अजय जडेजाबरोबरचे संबंध संपल्यानंतर माधुरीने डॉ. श्रीराम नेनेशी यांचेशी लग्न केले आणि ती तिच्या घरात स्थायिक झाली आणि जडेजा ना बॉलिवूडचां राहिला ना क्रिकेटचां.