केस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…

केस गळती थांबविण्यासाठी बिपाशा बसूने या औषधाची केली चाचणी, पहा कशी थांबली तीची केसगळती…

आपण सर्वजण बघतो की केस गळतीची समस्या अनेक लोकांना त्रासदायक ठरत आहे. बरेच लोक केसगळती चे संमस्ये पासून मुक्तता कशी मिळवायची याचे शोधात असतात. परंतु अनेक उपाय करून देखील केसगळती थांबविणे मुश्किल होऊन बसले आहे. अनेक लोक या समस्येपासून मुक्तता मिळविण्यासाठी डॉक्टर कडे जाऊन योग्य ती उपाय योजना करतात. काही लोक घरगुती उपाय देखील करतात. परंतु इतके सर्व करून देखील या समस्या सुटत नाही. आज आपण या लेखाद्वारे बिपाशा ने सांगितलेली एक नामी युक्ती वाचणार आहोत.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू तिच्या हटके अभिनयामुळे खूपच चर्चेत असते. तसेच तिचा लुक आणि तिचा फिटनेस देखील खूपच कौतुक करण्यासारखा आहे. बिपाशा सोशल मीडिया वर देखील ऍक्टीव्ह राहत असते ती आपल्या चाहत्यांना आपले सुंदर फोटो शेअर करत असते. तसेच व्हिडिओच्या माध्यमातून आपले ब्युटी सिक्रेट देखील शेअर करत असते.

नुकताच बिपाशा बासू ने इंस्टाग्राम द्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने केसांच्या मजबुती बद्दल सांगितले आहे. तिने व्हिडिओमध्ये केसांना मजबूत आणि दाट बनवण्याचे काही उपाय सांगितले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपाय घरगुती आहे. यामध्ये तिने कांद्याचा रस लावण्याचा देखील सल्ला दिला आहे. एका शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये बिपाशाने अनेक घरगुती उपाय संगितले आहेत ज्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल.

तुम्हीदेखील बिपाशा बसू सारखे केस घनदाट आणि मजबूत करू इच्छिता का तर मग बिपाशाने सांगितलेले हे उपाय वापरून बघा. हा उपाय करण्यासाठी फक्त दोन मध्यम आकाराच्या कांद्याची गरज भासेल. बिपाशाने सांगितलेल्या उपायाला करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम कांदा बारीक चिरून तो मिक्सर मध्ये टाका आणि त्याला बारीक करून घ्या. त्यानंतर त्या कांद्याला मिळून त्यातून कांद्याचा रस बाहेर काढा.

हा रस एका वाटीमध्ये काढून घ्या, त्यानंतर या रसाला घेऊन त्याद्वारे आपल्या केसांची हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर जवळपास असेच डोके एक तास ठेवा आणि एक तासानंतर डोके थंड पाण्याने धुऊन काढा. हा उपाय सोशल मीडियावर शेअर करताना बिपाशाने खाली असे लिहिले होते की, “मी 2 कांद्यांना किसून काढते, आणि त्यातून रस बाहेर काढते मग, ते माझ्या केसांना लावते आणि काही वेळानंतर धुऊन काढते”

बिपाशाने असे देखील सांगितले आहे की मी या रसा द्वारे हलक्या हाताने केसांची मालिश करते आणि केसांना एका तासासाठी मोकळे ठेवते. त्यानंतर केसांना धुवून काढते. पुढे बिपाशा असे सांगते की मी आठवड्यातून एकदा असे करणे सुरू केले आहे. यामुळे मला एक फायदा झाला की केस गळती थांबली आणि केस मजबूत बनले. तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही त्यात नारळाचे तेल व लिंबू टाकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12