भारतात या ठिकाणी आहेत जगातील सर्वात मोठे वटवृक्ष… गिनीज बुकात नोंद होऊन बनलय पर्यटन स्थळ…

भारतात या ठिकाणी आहेत जगातील सर्वात मोठे वटवृक्ष… गिनीज बुकात नोंद होऊन बनलय पर्यटन स्थळ…

भारतात कोट्यवधी वटवृक्ष तोडण्यात आले असले तरी, कोट्यवधी वटवृक्ष अद्याप शिल्लक आहेत, त्यापैकी हजारो जुने वटवृक्ष महाकाय आहेत, जसे की उज्जैनचां सिद्ध वट, प्रयागचां अक्षयवट, मथुरा-वृंदावन चां, गयावट, पंचवटी (नाशिक) चां पंचवट हे प्रमुख मानले जातात, परंतु या व्यतिरिक्त भारतात बरीच विशालकाय वट वृक्ष आढळतात. त्यातील एक म्हणजे ‘द ग्रेट बनियान ट्री’.

प्रथम हे विशालकाय वडाचे झाड पाहिल्यावर सुरुवातीला असे वाटते की हे एक लहानसे जंगल आहे ज्यामध्ये हजारो तत्सम झाडे उगवली आहेत, परंतु बारकाईने पाहिल्यास समजते की हे जंगल नसून एक मोठे विशालकाय असे वडाचे झाड आहे ज्याची मुळे आणि खोड चारही दिशेला फैलावले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे भारतात आहे हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त विशालकाय वटवृक्ष आहे. दरवर्षी भारत आणि परदेशातून हजारो पर्यटक ही वडा पाहण्यासाठी येतात.

हे वटवृक्ष आचार्य जगदीश चंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मध्ये कोलकाता येथे आहे. जेव्हा 1787 मध्ये बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली गेली तेव्हा या वडाचे वय 15 ते 20 वर्षे होते. या संदर्भात, आज या वडाचे वय 250 वर्षांहून अधिक आहे. दूरवरुन हे वडाचे झाड पाहिले तर ते हुबेहूब जंगलासारखे दिसते. खरं तर, वटवृक्षाच्या मुळ्या तसेच पारंब्या फांद्यांमधून निघून पाण्याच्या शोधात खाली सरकत राहिल्या, ज्या नंतर मुळे बणून झाडाला पाणी आणि आधार देत गेल्या.

शास्त्रज्ञांचा अस मत आहे की हे वटवृक्ष जगातील सर्वात रुंदीचे झाड आहे, जे सुमारे 14,500 चौरस मीटरपर्यंत पसरलेले आहे. या वटातील 3,372 पेक्षा जास्त पारंब्या व त्याची मूळ बनून लांबवर पसरली आहेत. सर्वात आनंददायी ते म्हणजे ह्या झाडावर वेगवेगळ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे पक्षांचे घर देखील आहे. सध्या हे झाड सुमारे 18.918 चौ.मी. च्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत. झाडाचा घेर सुमारे 486 मी. आहे. या झाडाची सर्वात उंच फांदी 24 मीटर लांब आहे. सध्या जमिनीवर पोहोचणार्‍या मुळांची एकूण संख्या 3,772 आहे.

सन 1884 आणि सं 1987 या वर्षात झालेल्या दोन चक्रीवादळामुळे या झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सन 1925 मध्ये या झाडाचे फांद्यामध्ये बुरशी मिळून आली होती, त्यानंतर त्या फांद्या तोडाव्या लागल्या होत्या, परंतु या सर्व संकटाचा सामना करूनही आज ही हे वटवृक्ष आपल्या जागी ठाम आणि स्थिरपणे उभे आहे. 19 व्या शतकाच्या दरम्यान याचा उल्लेख नक्कीच पाहायला मिळतो.

या झाडाची वैभवता पाहता, त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. या विशाल वटवृक्षाचा सन्मान म्हणून भारत सरकारने 1987 मध्ये डाक तिकीट चां शिक्का अमलात आणला. व हे वटवृक्ष भारताचे वानस्पतिक सर्वेक्षणचे प्रतीकही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12