भरगोस समृद्धी आणि संपत्तीच्या वर्षांवासाठी अंघोळ करताना करा हा उपाय, तुम्हाला कधी पैश्याची कमी भासणार नाही

आंघोळ ही फक्त आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते. तुम्हाला नवल वाटेल पण याचा संबंध आपल्या आर्थिक परिस्थितीशीही जोडला गेला आहे. शास्त्रात रोज अंघोळ करण्याचे महत्व समजावून सांगितले आहे. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे कि आंघोळ करताना एक लहानसे काम केले तर आपली आर्थिक स्थिती नक्कीच सुधारू शकते.
यासाठी तुम्हाला फक्त आंघोळ करताना एका मंत्राचा जप करायचा आहे. हा कोणताही साधासुधा मंत्र नाही तर याचा उल्लेख शास्त्रांत केला गेला आहे. शास्त्रानुसार या मंत्राचा जप नियमित केल्याने लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते असे म्हटले जाते.
काय आहेत याचे फायदे, नक्की वाचा :-
शास्त्रांत रोजच्या सगळ्याच नित्यकर्मांसाठी वेगवेगळे जप सांगितले गेले आहेत. याचा अर्थ असा कि प्रत्येक नित्य कार्य करताना एका मंत्राचा जाप करणे निर्धारित केले गेले आहे. अगदी याच क्रमाने आंघोळ करतानाही एका मंत्राचा उल्लेख शास्त्रात केला गेला आहे. या मंत्राचा उच्चार जर का अंघोळ करतेवेळी केलात तर त्याची गरिबी दूर होऊन पैसे येऊ लागतील. त्याला पैशाची उणीव कधीही भासत नाही. या मंत्राचा वापर अनेक जणांनी केला आहे व त्यांना याचा खूपच चांगला अनुभव आला आहे.
काय आहे या मंत्राचा विधी :-
वास्तविक हा एक तांत्रिक उपाय आहे. असे पहिले गेले आहे कि जी व्यक्ती तांत्रिक उपाय योग्य पद्धतीने करते तिला लवकरच लाभ होतो. म्हणून तुम्ही आंघोळ ज्या पाण्याने करणार असाल त्यावर हाताच्या बोटाने त्रिभुज चिन्ह बनवा. हे चिन्ह बनवल्यानंतर त्याच्या मधोमध ‘ह्रीं’ लिहा, हा एक मंत्र आहे. हे करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण हे करताना काही चूक झाल्यास तर तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत.
काय आहे पूर्ण मंत्र :-
त्रीभूजात ‘ह्रीं’ लिहिल्यानंतर आंघोळ करताना “गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।” असा जप करा. आंघोळ करताना केलेला हा एक उपाय तुमचे संपूर्ण जीवन बदलवून टाकू शकतो, म्हणूनच हे करताना सावधपणे करा. या उपायाने तुमच्या सगळ्याच समस्या दूर होतील. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होऊन तुम्ही जे कार्य कराल त्यात तुम्हाला सफलता मिळू लागेल. हा उपाय अनेक दिवस करा आणि आपल्या इष्ट देवतांची पूजाही करत राहा.