सैफची पत्नी होण्यापूर्वी अमृताचा या क्रिकेटपटू सोबत झाला होता साखरपुडा, पहा अमृताचे या एका चुकीमुळे मोडले होते जमलेले लग्न…

सैफची पत्नी होण्यापूर्वी अमृताचा या क्रिकेटपटू सोबत झाला होता साखरपुडा, पहा अमृताचे या एका चुकीमुळे मोडले होते जमलेले लग्न…

कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. हजारो लोक या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडले आहेत. सरकारने लोकांच्या सुविधेसाठी संपूर्ण भारतात लॉकडाउन देखील केला होता परंतु आता पूर्णपणे अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे. बॉलीवूड सोबत टीव्ही इंडस्ट्री देखील सक्रीय झाली आहे. आपल्या चित्रपटांचे चित्रीकरणामध्ये सर्व जण व्यस्त होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री अभिनेता यांचे विविध किस्से शेअर होत असतात.

त्यावर त्या अभिनेत्यांची किंवा अभिनेत्रींची खूपच चर्चा देखील होत असते. तसेच काही व्हिडिओ किंवा फोटो देखील बऱ्याच प्रमाणात व्हायरल होऊन त्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना एक चर्चेचा विषय बनवत असतात. दुबईमध्ये आयपीएल खूप जोमात सुरू झाले आहे आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळाडूंचे लव अफेअर्स चे किस्से देखील खूपच चर्चेत येत आहेत. असाच एक किस्सा आम्ही आजच्या या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत.

हा किस्सा आहे सैफ अली खान यांची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा आणि एका क्रिकेटरचा सैफ अली खान यांच्या पत्नीचे अफेयर एका क्रिकेटर सोबत होते ह्या क्रिकेटर चे नाव आहे ‘रवी शास्त्री’. तरुण आणि तरूणींच्या तसेच क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली ऐंशीच्या दशकातील खूपच नावाजलेले क्रिकेटर रवी शास्त्री यांच्या वर अमृतासिंग फिदा झाली होती. ऐंशीच्या दशकात जेव्हा अमृता आणि रवी दोघेही करिअरच्या मुख्य स्थानी पोहोचले होते तेव्हा त्यांच्या या लव्ह स्टोरी ने सर्वांना चकित करून सोडले होते.

त्याकाळी रवी शास्त्री हे खूपच जबरदस्त क्रिकेट खेळत होते. त्यांच्या क्रिकेटच्या चर्चा खूपच रंगताना दिसत असे. जेव्हा एखाद्या स्टेडियमवर भारतीय संघाची मॅच असेल तेव्हा रवी शास्त्री यांची बॅटिंग बघण्यासाठी अमृता सिंग नेहमी स्टेडियम मध्ये जात असत. परंतु त्यांनी आपल्या नात्याबद्दल खूपच उघडपणे सांगितले नव्हते. तसेच ह्या नात्याला त्यांनी सर्वासमोर स्वीकारले देखील नव्हते.

एकदा तर अमृताने रवी यांची मॅच पाहण्यासाठी शारजाह येथे गेली होती. तेथे शास्त्री यांनी मारलेल्या प्रत्येक चौकार आणि सिक्सर वर अमृता खूपच टाळ्या वाजवून जल्लोष करून रवी शास्त्री यांचे मनोबल वाढवत होती. एवढेच नव्हे तर जेव्हा अमृतासिंग चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असे तेव्हा रवी शास्त्री देखील सेटवर येत असे. जेव्हा रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचा फोटो एका मॅक्झिन वर छापला गेला होता तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

याबाबत खूपच चर्चा देखील झाली होती.तसेच बऱ्याच अफवा देखील उडाल्या होत्या की दोघांनी साखरपुडा देखील उरकवला आहे आणि लवकरच ते लग्न देखील करणार आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा त्याकाळी उडवल्या गेल्या होत्या. दोघेही आपल्या रिलेशनशिपला घेऊन खूपच सिरीयस होते आणि लग्न देखील करू इच्छित होते. परंतु लग्नापर्यंत पोहोचे पर्यंत पोहोण्याआधीच त्यांचा ब्रेक-अप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

त्यांचाब्रेकअप का झाला होता हे एका इंटरव्ह्यूमध्ये रवी शास्त्री यांनी उघड देखील केले होते. त्यांनी असे सांगितले होते की मला कधीही एक अभिनेत्री पत्नी म्हणून कधीही आवडत नव्हते. कारण माझ्या मला असे वाटत होते की माझी पत्नी सर्वात आधी माझ्या घराकडे लक्ष देईल. तिच्यासाठी घर सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक राहील.

रवी शास्त्री यांनी सांगितलेल्या या गोष्टी नंतर अमृता सिंग यांनी देखील एका इंटरव्यू मध्ये असे उघड केले की ह्यावेळी मी आता फक्त करिअरकडे लक्ष देत आहे. त्यामुळे मी आमचे हे नाते आम्ही पुढपर्यंत टिकवू शकलो नाही परंतु त्यानंतर अमृताने असे सांगितले की काही वर्षातच मी एक आई आणि एक पत्नी नक्की होईल.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x