पहिल्याच प्रयत्नात सर्वात कमी वयात IAS ऑफिसर बनून घडवला इतिहास… वाचा यशाची परिपूर्ण कहाणी…

आज आपण बघत आहोत की एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी. च्या परीक्षेची तयारी बरेच जण करत आहेत. त्यात प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत बघितली तर त्यात पण विभिन्नता आढळून येते. जरी काहीही असले तरी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारे कमीच असतात. तथापि नाहीच होत कुणी पहिल्या प्रयत्नात यशस्वी.
पहिल्याच प्रयत्नात, आयएएस होणाराची ही आहेत सक्सेस स्टोरी. सर्वात तरुण आयएएस अधिकारी होण्यासाठी विद्यार्थी इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करु शकतात. हे सिद्ध झाले आहे. प्रदीप सिंह जो बिहारचा आहे. पालकांच्या व्यासंग आणि प्रदीपच्या अभिमानामुळे. प्रदीपने हा टप्पा गाठला आहे. प्रदीप हे यूपीएससी इतिहासातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहेत.प्रदीपचे वडील पेट्रोल पंपावर काम करायचे. सामान्य कुटूंबातून असून सुद्धा देशातील सर्वात कठीण मानली जाणारी युपीएससी ची परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्यासाठी सर्वात लहान वयातच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली.
सन 2018 मध्ये प्रदीपसिंग 93 रँकसह परीक्षा उत्तीर्ण झाला. प्रदीपसिंगचे वडील पेट्रोल पंपावर काम करायचे. प्रदीप सिंह मूळचे बिहारच्या गोपाळगंजमधील आहेत. मुलांच्या शिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी वडिलांनी बिहार सोडले. गावात वडिलांची काही जमीन होती. ज्यावर घरातील महिला शेती करीत असत. आणि वडील इंदूरला आले. प्रदीपसुद्धा चांगल्या भविष्याच्या शोधात इंदोरला आला होता आणि लवकरच त्याने आपल्या अभिमानाने इतिहास घडवला. प्रदीपच्या कष्टांची ही कहाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे.
प्रदीपने एका मुलाखतीत सांगितले की आपल्याला या परीक्षेबद्दल जास्त काही माहिती नव्हते. परंतु लहानपणी घरात आईवडील ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराबद्दल नेहमी बोलायचे. आणि जेव्हा प्रदीप त्यांचे तोंडून ‘अधिकारी’ हा शब्द ऐकायचं तेव्हा त्यांचे डोळे चमकून जायचे. आणि तीच गोष्ट त्याच्या मनावर बिंबली होती. आणि त्याच्या मेहनत आणि चिकाटीने यशाचा हा टप्पा गाठला.