गर्लफ्रेंड मालायकाच्या पाठोपाठ अर्जुन कपूरने महागड्या स्कायव्हीलामध्ये घेतला प्लॅट, किंमत बघून तोंडात बोट घालाल…

बांद्रा वेस्ट हा भाग सुरुवातीपासूनच बॉलिवूड कलाकारांचा आवडीचा भाग आहे. मुंबईमधील बांद्रा वेस्ट या भागात बॉलीवूडचे जवळपास सर्वच अभिनेता, अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक, थोडक्यात सर्वच सेलेब्रिटीज राहतात. म्हणून या भागाला मुंबईच्या नेहमीच सर्वात महागडा आणि स्टायलिश असा भाग समजला जाते.
याच भागात स्काईवीला नावाचा मोठा प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. बॉलीवूड चे बरेच सेलेब्रिटी या स्काईवीला मध्ये आपले स्वप्नाचे घर घेत आहेत. केवळ बॉलीवूड सेलेब्रिटीज च नाही तर काही, टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील कलाकार देखील स्काईवीला मध्ये घर घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी, शत्रूग्न सिन्हा यांची मुलगी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध बभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील स्काईवीला मध्ये आपले घर घेतले असलयाचे समोर आले होते. त्यासाठी खास इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी तिने बॉलीवूडच्या खिलाडी कुमारची बायको आणि अभिनेत्री ट्वीनकल खन्नाच्या कंपनीला संपर्क साधला होता, अशी माहिती देखील समोर आली होती.
आताच, काही दिवसांपूर्वी बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोराने देखील स्काईवीला मध्ये घर घेतल्याचे समोर आले होते. आणि आता त्याचबरोबर अर्जुन कपूर ने देखील स्काईवीला मध्ये आपले घर घेतले असल्याची माहिती आली आहे. बांद्रा वेस्ट मधील स्काईवीला मध्ये २० कोटींमध्ये अर्जुन कपूरने विकत घेतला आहे.
असे सांगितले जात आहे कि आता, अर्जुन आणि मलायका च्या नात्यामध्ये जे हवे होते ते स्थैर्य आले आहे त्यामुळे त्याने तिच्याच घराच्या जवळ आपले घर घेतले आहे. २५ मजल्यांच्या या इमारतीमध्ये, ८१ स्काई वीला आहेत. सध्या अर्जुन आपल्या गर्लफ्रेंड सोबत अनेक ठिकाणी सोबत असलेला बघायला मिळतो. त्यातच त्याने, मलायका च्या घराजवळचा आपले घर देखील आहे.
त्यामुळे आता नक्की या दोघांचा आपल्या नात्याबद्दल काय विचार आहे, असे सगळीकडून बोलले जात आहे. सोबत राहत असला टतरीही अर्जुन प्रत्येकाच्या प्रायव्हसी ची काळजी आणि आदर दोन्हीही करतो, म्हणून मलायका च्या घराजवळ त्याने घर घेतले असले तरीही त्याने मलायका ला लागणार स्पेस कधीच डिस्टर्ब होणार नाही असे वर्तवण्यात येत आहे.
८१ ओरिएट असे अर्जुन कपूरच्या स्काईवीलाचे नाव आहे. या स्काईवीला मधून अरबी समुद्र आणि मुंबईचा ग्लिटरिंग स्काई लाइन देखील दिसते. हा एक इंटरनॅशल डिझायनर टॉवर आहे. यामध्ये स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ सोबत अनेक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज साठी भाग आहे. ४ बीएचके असणाऱ्या एका फ्लॅट मध्ये ४२१२ स्क्वेअर फूट कार्पेट आहे.